अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट त्यांच्या करिअरमधल्या सर्वांत उत्तम टप्प्यावर आहेत असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण रणवीरचा ‘सिम्बा’ आणि आलियाचा ‘राजी’ या दोन दमदार चित्रपटानंतर आता पहिल्यांदाच ही जोडी एकत्र झळकणार आहे. ‘गली बॉय’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणाऱ्या ‘डिवाईन’ म्हणजे विवियन फर्नांडिस आणि ‘रॅपर नॅझी’ म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून ‘गली बॉय’च्या कथानकासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये रणवीर आणि आलियाच्या दमदार अभिनयाची पुन्हा एकदा झलक पाहायला मिळते.
Wohooooo!! #GullyBoyTrailer out now!! https://t.co/hAbSFo8cdY@ritesh_sid #ZoyaAkhtar @FarOutAkhtar #TigerBaby @RanveerOfficial @aliaa08 @ZeeMusicCompany @excelmovies
— Alia Bhatt (@aliaa08) January 9, 2019
रणवीर आणि आलियासोबतच एक मराठमोळी अभिनेत्रीदेखील या चित्रपटात झळकणार आहे. अभिनेत्री अमृता सुभाष यामध्ये रणवीरच्या आईच्या भूमिकेत आहे. झोया अख्तर दिग्दर्शित हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.