हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांना भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गुलजार यांनी आजपर्यंत हिंदी चित्रपटांसाठी अनेक अजरामर गाणी लिहिली आहेत. एक संवेदनशील कवी म्हणून गुलजार यांची हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख आहे. र. डी. बर्मन, ए. आर. रेहमान आणि विशाल भारद्वाज या संगीतकारांबरोबरची त्यांची गाणी विशेष प्रसिद्ध होती.
यापूर्वी गुलजार यांना १९७७, १९७९, १९८०, १९८३, १९८८, १९८८, १९९१, १९९८, २००२, २००५ मध्ये सर्वश्रेष्ठ गीतकाराच्या फिल्मफेअर पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. तसेच २००४ गुलजार यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
गुलजार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांना भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
First published on: 12-04-2014 at 04:18 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulzar to receive dadasaheb phalke award