मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या कारचा अपघात झाला आहे. पुण्यातील मावळ येथे ही घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. पण कारचे मोठे नुकसान झाले आहे. किशोरी शहाणे यांनी स्वत: सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किशोरी शहाणे यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर कार अपघाताचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी ‘आमच्या गाडीचा अपघात झाला. अपघातामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने आमचा जीव बचावला. देवाच्या आशिर्वादाने आम्हाला दुखापत झालेली नाही. जाको राखे साईया मार सकें ना कोई…’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “मला नुकसान भरपाई म्हणून ५ कोटी रुपये आणि…”, किरण मानेंची मागणी

किशोरी शहाणे या एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्यांना दुखापत झालेली नाही. मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी गाडीचा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

किशोरी शहाणे या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या सध्या स्टार प्लस वाहिनीवरील ‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेत काम करताना दिसत आहेत. त्यापूर्वी त्या ‘बिग बॉस’च्या घरात दिसल्या होत्या.