यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला पहिला पुरस्कार मिळाला आहे. भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे. भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. या शॉर्ट फिल्मने प्रॉडक्शनमध्ये पहिल्यांदाच भारतासाठी ऑस्कर जिंकला आहे. या शॉर्ट फिल्मच्या निर्मात्या गुनीत मोंगा आहेत. पुरस्कार जिंकल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Oscar Awards 2023: भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने रचला इतिहास; ‘या’ श्रेणीत जिंकला ऑस्कर पुरस्कार

गुनीत मोंगा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “आजची रात्र ऐतिहासिक आहे कारण भारतीय निर्मितीसाठी हा पहिलाच ऑस्कर आहे. दोन महिलांसह भारताचा गौरव. धन्यवाद आई-बाबा, गुरुजी, माझे सह-निर्माता अचिन जैन, टीम सिख्या, नेटफ्लिक्स, अलोके, सराफिना, WME बॅश संजना. माझा लाडका नवरा सनी. ही कथा आणल्याबद्दल कार्तिकीचे धन्यवाद. जय हिंद!” असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

गुनीत मोंगा यांनी एक ट्वीटही केलं आहे. “आम्‍ही आत्ताच भारतीय प्रॉडक्‍शनसाठी पहिला ऑस्कर जिंकला! दोन महिलांनी हे करून दाखवलंय! मी अजूनही थरथरत आहे,” असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ही नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी आहे. त्यात सोडून दिलेला हत्ती आणि त्याची काळजी घेणारी व्यक्ती यांच्यातील अतूट बंधन दाखवण्यात आले आहे. ‘हॉलआउट’, ‘हाऊ डू यू मेजर अ इयर?’, ‘द मार्था मिशेल इफेक्ट’ आणि ‘स्ट्रेंजर अॅट द गेट’ हे लघुपटही नॉमिनेटेड होते. या सर्वांना मागे टाकत भारतीय लघूपट ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने पुरस्कार जिंकला आहे.