भारताने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यामध्ये ‘नाटू नाटू’ व ‘द एलिफंट व्हिस्परर्स’साठी दोन ऑस्कर जिंकली.‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार जिंकल्यावर, या लघुपटाच्या निर्मात्या गुनीत मोंगा चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. त्यांना ऑस्कर मिळाल्यावर त्यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांची भेट घेतली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील ‘तो’ प्रसंग रणबीर कपूरने केला रिक्रिएट, म्हणाला, “ते दोघे एकत्र…”

ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा यांनी अलीकडेच ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये हजेरी लावली होती. या वेळी त्यांनी ऑस्कर जिंकल्यावर कसा अनुभव होता याविषयी सांगताना खंत व्यक्त केली. गुनीत मोंगा म्हणाल्या, “आता माझ्यासोबत नेहमी ऑस्करची ट्ऱॉफी असल्याने कोणालाही माझ्यासोबत फोटो काढण्यात रस नसतो सगळे जण ट्रॉफीबरोबर फोटो कसा काढता येईल हे पाहतात.”

हेही वाचा : अमिताभ बच्चन आणि अनुष्काला बाईक राईड पडणार महागात, व्हायरल व्हिडीओवर मुंबई पोलिसांनी केलेले ट्वीट चर्चेत

गुनीत मोंगा यांना ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये तुमच्या घरी आता पाहुणे आले की, सगळ्यात आधी कोणाबरोबर फोटो काढतात? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर, सगळे जण ट्रॉफीबरोबर फोटो काढतात. मला नाही वाटत कोणाला माझ्यासोबत फोटो काढण्यात रस असतो, असे त्यांनी सांगितले. हे ऐकून कपिल शर्मा म्हणतो, “त्या सगळ्या लोकांनी ही ट्रॉफी भारतात कोणामुळे आली याचा विचार केला पाहिजे.”

ट्रॉफी बाहेर कुठे न्यायची असल्यास मी काळ्या कपड्यात व्यवस्थित गुंडाळून नेते, परंतु काही जण एअरपोर्टवरसुद्धा ट्रॉफी बघायची आहे म्हणून विनंती करतात. अशा वेळी मी त्यांना ट्रॉफी दाखवते आणि लोक तेव्हासुद्धा फोटो काढण्यात मग्न होतात, असे ऑस्कर विजेत्या निर्मात्या गुनीत मोंगा यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guneet monga reveals everyone wants to take photos with oscar trophy sva 00