‘युवा व्हिजन’ या संस्थेतर्फे ‘नृत्यकला निकेतन’च्या संचालिका गुरू अर्चना पालेकर यांना ‘मदर इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या ४१ वर्षांपासून त्या भरतनाट्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान तसेच भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याच्या प्रचार आणि प्रसाराबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमात नृत्यकला निकेतन’च्या ३६ विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीने गुरू अर्चना पालेकर यांना अनोखी गुरू दक्षिणा वाहिली. यावेळी या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र गीतावर ३. ३६ सेकंदाचे भारतनाट्यम सादरीकरण केले. याची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. त्याचे सन्मानचिन्ह आणि नियुक्ती पत्र गुरू अर्चना पालेकर यांना देण्यात आले आहे.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाबद्दल केदार शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले “याचा शेवट…”
या सोहळयात ‘शिवतांडव स्तोत्र, महिषासूर मर्दिनी स्तोत्र, स्वामी तारक मंत्र या धार्मीक स्तोत्रांवर भरत नाट्यमचेही सादरीकरण करण्यात आले.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात साधनाच्या सूनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण? जाणून घ्या
“प्रत्येक गुरूला एक चिंता असते की, माझा वारसा कोण चालवणार? पण मला याची चिंता नाही. कारण मी दोन पिढयांना घडवलेले आहे. इथे मला माझी मुलगी नृत्य दिग्दर्शिका मयुरी खरात आणि माझी नात मानसी खरात यांचा उल्लेख मला आवर्जुन करावसा वाटतोय. ‘नृत्यकला निकेतन’चा वारसा त्या जपातीलच. शिवाय दर्जेदार विद्यार्थिनीही त्या घडवतील याची मला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया अर्चना पालेकर यांनी दिली.