प्रेम जगातली सगळ्यात सुंदर भावना. ती शब्दात व्यक्त करणं अवघडच. प्रेम हे प्रेम असतं ते कोणी आणि कोणावर केल यावर ते चूक की बरोबर हे नाही ठरवता येत. आयुष्यात कोणत्या ना कोणत्या वळणावर आपण प्रेमात पडतोच. प्रेम कधी रिमझिम बरसणार तर कधी आवेगाने झेपावणा.. अगदी पावसासारखं. प्रेमाची हीच गंमत मेघना मनोज काकुलो निर्मित, गिरीश मोहिते दिग्दर्शित ‘गुरु पौर्णिमा’ चित्रपटाच्या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. येत्या सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणा-या गुरु पौर्णिमा चित्रपटाच्या रोमॅण्टिक संगीताचे प्रकाशन नुकतेच झाले.
‘गुरु पौर्णिमा’ चित्रपटात लव्हेबल प्रेमाची गोष्ट चित्रित करण्यात आली असून, उपेंद्र लिमये आणि सई ताम्हणकर यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना अनोखी ट्रीट ठरणार आहे. हा चित्रपट लव्हस्टोरीवर आधारित असल्याने याचे संगीत तरुणाईला ताल धरायला लावणारे आहे. अविनाश-विश्वजीतने चित्रपटातील गीतांना संगीत दिले असून, बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर, स्वरुप भालवणकर, संदीप उबाळे, नेहा राजपाल, श्रावणी रविंद्र यांनी गाणी गायली आहेत.
उपेंद्र लिमये, सई ताम्हणकर यांच्यासह हिंदीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्य, सुशांत नायक, राजीव हेडे, विधीता काळे यांंनी भूमिका साकारल्या आहेत. गोव्यातल्या नयनरम्य लोकेशन्सवर चित्रित झालेला ‘गुरु पौर्णिमा’ सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

Story img Loader