‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ शोमध्ये कपिल शर्माबरोबर बिनसल्यानंतर बाहेर पडलेला सुनिल ग्रोव्हर कपिलच्या शोमध्ये परत येणार असल्याची चर्चा आहे. ‘कॉमेडी नाईट्स…’ मधून बाहेर पडल्यावर सुनिलने ‘मॅड इन इंडिया’ नावाचा स्वत:चा शो काही काळ चालवला. परंतु, सुनिलचा हा शो ‘कॉमेडी नाईट्स…’ प्रमाणे यश मिळवू शकला नाही परिणामी सुनिलला आपल्या या शोचा गाशा गुंडाळावा लागला. असे असले तरी, आता त्याने पुन्हा ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शोमध्ये परत येण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. कपीलबरोबरचा आपला वाद मिटविण्याची तयारी त्याने दर्शविली आहे. निश्चितच गुत्थी ही कपिलच्या शोची प्लस पॉईन्ट होती, त्यामुळे तिच्या पुनरागमनाने ‘कॉमेडी नाईट्स…’चा टीआरपी वाढण्यात मदतच होईल. गुत्थीच्या पुनरागमनाची तिचे चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पहात आहेत.

Story img Loader