बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरने नुकतेच ‘हैदर’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. ‘हैदर’ हा आपल्या कारकीर्दीतील आव्हानात्मक चित्रपट असल्याचे शाहिदने म्हटले आहे.
शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’वर आधारित विशाल भारद्वाजच्या या चित्रपटात शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट १२ सप्टेंबरला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. ” ‘हैदर’चे चित्रीकरण पूर्ण केले…. जेव्हा तुम्ही हेम्लेट साकाराल तेव्हा तुम्हाला हे काम किती कठीण आहे ते कळेल… माझ्यासाठी ही आतापर्यंतची आव्हानात्मक भूमिका आहे. सध्या आराम करण्याची वेळ आहे.”, असे शाहिदने ट्विट केले आहे. इरफान खान, तब्बू आणि के के मेनन यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत.
‘हैदर’चे चित्रीकरण काश्मिरमध्ये करण्यात आले आहे. मात्र, या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला चित्रीकरणावेळी वारंवार स्थानिक नागरिकांच्या निषेधाला सामोरे जावे लागले होते.

Story img Loader