दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या आगामी ‘हैदर’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे अभिनेत्री श्रद्धा कपूरची स्वारी सध्या भलतीच खुश आहे. एक कलाकार म्हणून तुमच्या कारकीर्दीत इतक्या लवकर तुम्हाला ‘हैदर’सारख्या चित्रपटात काम करण्याची संधी क्वचितच मिळते, असे मत श्रद्धाने व्यक्त केले आहे. या चित्रपटात तब्बू, के.के.मेनन आणि इरफान खान यांसारख्या कलाकारांबरोबर मला काम करायला मिळाले, या गोष्टीवर माझा अजूनही विश्वास बसत नसल्याचे श्रद्धा कपूरने सांगितले.
‘हैदर’ हा चित्रपट शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ या कलाकृतीवर आधारित आहे. यापूर्वीसुद्धा विशाल भारद्वाजने शेक्सपिअरच्या ‘ओथेल्लो’ आणि ‘मॅकबेथ’ या कलाकृतींवर आधारित ‘ओमकारा’ आणि ‘मकबुल’ हे दोन चित्रपट बनवले होते. या दोन्ही चित्रपटांचे समीक्षकांनीही कौतूक केले होते. त्यामुळे चित्रपटप्रेमींना आता ‘हैदर’विषयी प्रचंड उत्सुकता लागली आहे. श्रद्धा कपूर या चित्रपटात मुळ कथेतील हॅम्लेटची दुर्देवी प्रेयसी ओफेलियाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात शाहीद कपूर, तब्बू, के.के.मेनन, इरफान खान आणि श्रद्धा कपूर अशी तगड्या कलाकारांची फळी आहे.

Story img Loader