अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटाचा पहिला टिझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरमध्ये श्रद्धा किंवा अर्जुनची झलक दिसत नसून चित्रपटासंबंधीच्या काही गोष्टी या पोस्टरद्वारे सर्वांसमोर उघड करण्यात आल्या आहेत. #halfgirlfriend #filmfact1 अशा हॅशटॅग अंतर्गत हा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अतिशय लक्षवेधी अशा या पोस्टरमध्ये बास्केट बॉल कोर्ट दिसत असून या पोस्टरवर एनबीए या विश्वविख्यात बास्केटबॉल लीगविषयीची माहिती देण्यात आली आहे. त्यासोबतच एका वेगळ्याच अंदाजात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. १९ मे ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून आता हा पोस्टर पाहता प्रेक्षकांमध्ये श्रद्धा आणि अर्जुनच्या लूकविषयीच्या विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकावर श्रद्धा, अर्जुनच्या या आगामी चित्रपटाचे कथानक आधारलेले असून या चित्रपटामध्ये अर्जुन कपूर एका सर्वसामान्य बिहारी तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे. जो दिल्लीच्या एका श्रीमंत तरुणीच्या (आलियाच्या) प्रेमात पडतो. त्यामुळे आता या दोघांच्या प्रेमाचा बॉल बास्केटमध्ये जाण्यात यश मिळवणार का हे येत्या काळात कळेलच.

दरम्यान, चेतन भगतच्या पुस्तकांवर आधारित ‘काय पो चे’ आणि ‘टू स्टेट्स’ या चित्रपटांनंतर आता लवकरच त्याच्या आणखी एका पुस्तकाचा आधार घेत ‘हाफ गर्लफ्रेंड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यामुळे त्यांच्या वाचकांमध्येही या चित्रपटासंबंधीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अर्जुन साकारत असलेल्या भूमिकेची गरज पाहता ‘बास्केटबॉल’ हा या चित्रपटातील एक महत्त्वाचा घटक असल्यामुळे अर्जुन कपूरने चक्क बास्केटबॉलचे धडे गिरवले आहेत. चित्रपटातील बास्केटबॉल खेळतानाचे सीन्स अगदी खरे आणि परिणामकारक वाटावेत यासाठी हा सारा घाट घालण्यात आला होता. अर्जुनने बास्केटबॉल शिकण्यासाठी थेट अमेरिकेच्या सुप्रसिद्ध ‘एनबीए क्लब’चीच मदत घेतली असल्यामुळे त्याचे बास्केटबॉल खेळण्याचे कसब या चित्रपटातून नक्कीच पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Half girlfriend shraddha kapoor arjun kapoor film to release on may