अलीकडच्या काळात छोट्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचे भावविश्व रेखाटणाऱ्या सिनेमांची निर्मिती मराठीत प्रकर्षाने होताना दिसतेय. ‘हाफ तिकीट’ हा असाच एक वेगळा दृष्टीकोन देणारा सिनेमा निर्माते नानूभाई जयसिंघानी व दिग्दर्शक समित कक्कड घेऊन आले आहेत.
आजवर अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती व प्रस्तुती करणारे नानूभाई जयसिंघानी यांनी ‘हाफ तिकीट’ हा सिनेमा रसिकांसाठी आणला आहे. वेगळे विषय हाताळणारे दिग्दर्शक समित कक्कड यांनी यापूर्वी ‘आयना का बायना’ या चित्रपटातून बालसुधारगृहातील लहान मुलांच भावविश्व रेखाटलं होत. या चित्रपटाने १८ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करीत आपली मोहोर उमटवली होती. आता ‘हाफ तिकीट’च्या माध्यमातून पुन्हा एकदा लहान मुलांची अनोखी कहाणी ते मांडणार आहेत.
आपल्या कॅमेराच्या जादूने आपली वेगळी ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे हे ‘हाफ तिकीट’चे छायाचित्रण करीत आहेत. या सिनेमाचे गीतलेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले असून संगीताची जबाबदारी जी.वी.प्रकाश यांनी सांभाळली आहे. या दिग्गजांच्या नजरेतील ही कलाकृती नक्कीच वेगळी असेल यात शंका नाही. मुंबईच्या रिअल लोकेशन्सवर ‘हाफ तिकीट’च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा