मागच्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या लग्नाबद्दलच्या चर्चा सुरू होत्या. अखेर बुधवारी अभिनेत्रीने स्वतःचं तिच्या लग्नाच्या चर्चांना दुजोरा दिलाय. हंसिकाने तिचा बॉयफ्रेंड आणि बिझनेस पार्टनर सोहेल खातुरियाबरोबरच्या एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आहेत.

सोहेलने पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर हंसिकाला प्रपोज केलं. अगदी चित्रपटातल्या सीनप्रमाणे सोहलने रोमँटिक अंदाजात तिला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. सोहेल ब्लॅक सूटमध्ये हँडसम दिसतोय, तर हंसिकाने स्ट्रॅपलेस पांढरा ड्रेस परिधान केला आहे. हंसिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर करत त्याला “Now&Forever” असं कॅप्शन दिलंय. वरुण धवन, अनुष्का शेट्टी, करण टॅकर, पीव्ही सिंधू आणि शिवालिका ओबेरॉय यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या जोडप्याचं अभिनंदन केलंय.

गेल्या काही दिवसांपासून हंसिका या वर्षाच्या अखेरीस विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. यासंदर्भात तिने आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण तिने सोहेलबरोबरचे एंगेजमेंटचे फोटो शेअर करत नात्याची कबुली दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हंसिका आणि सोहेल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लग्न करणार आहेत. पण हंसिकाने लग्नाच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही, त्यामुळे ते खरंच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लग्न करणार की नाही, याबद्दल स्पष्टता नाही.

Story img Loader