अभिनेत्री हंसिका मोटवानीने नुकताच तिच्या रिलेशनशिपबाबत खुलासा केला. तिने सोहेल खातुरियाबरोबर एंगेजमेंट केली आहे. आता दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. दोघेही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लग्न करणार असल्याची माहिती मिळतेय. सोहेलने हंसिकाला पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर रोमँटिक अंदाजात प्रपोज केलं. सोहेलच्या प्रपोजलला हंसिकाने होकार दिला आणि नंतर फोटो सोशल मीडियावर शेअर केले. दरम्यान, हंसिकाचा होणारा पती सोहेलबद्दल माहिती समोर आली आहे. सोहलचं हे दुसरं लग्न आहे.

हेही वाचा – अभिनेत्री हंसिका मोटवानीला आयफेल टॉवरसमोर प्रपोज करणारा सोहेल खातुरिया आहे तरी कोण?

सोहेलचे पहिले लग्न रिंकी बजाजशी झाले होते. २०१६ मध्ये दोघांचं गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग झालं होतं. या लग्नात हंसिका मोटवानीदेखील उपस्थित होती. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सोहेल आणि रिंकीच्या लग्नाचे काही क्षण दिसत आहेत. या व्हिडीओत हंसिका डान्स करता ना दिसत आहे. दरम्यान, रिंकी आणि सोहेल विभक्त का झाले, याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. सोहेल व हंसिका दोघेही बिझनेस पार्टनर आहेत. दोघांची एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हंसिका व सोहेल ४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकतील. त्यांच्या लग्नाचे फंक्शन २ डिसेंबरपासून सुरू होईल. हे रॉयल डेस्टिनेशन वेडिंग जयपूरमध्ये एका जुन्या किल्ल्यात होणार आहे. या सोहळ्यात फक्त त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. सोहेल व हंसिकासह त्यांचे कुटुंबीय सध्या लग्नाच्या तयारीत व्यग्र आहेत.

Story img Loader