बॉलिवूडमध्ये बालकलाकार व अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका करून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे हंसिका मोटवानी होय. तिने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. प्रामुख्याने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे हंसिकाला भेदभावाचा सामनाही करावा लागला. तिला डिझायनर कपडे मिळायचे नाहीत, याबद्दल तिने स्वतःच खुलासा केला आहे.

हेही वाचा – Video: “गमावलं ना मी तुला”! मराठी अभिनेत्रीचा भीषण अपघात, कारचा झाला चेंदामेंदा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

डिझायनर हंसिकाला त्यांचे कपडे देण्यास स्पष्ट नकार देत असत. त्यामागचं कारण म्हणजे ती दाक्षिणात्य अभिनेत्री होती. पण गेल्या अनेक वर्षांत मोठे बदल झाल्याचे हंसिका मानते. तिच्याकडे दुर्लक्ष करणारे, तिला नकार देणारे डिझायनर आज तिला त्यांचे कपडे पाठवतात जेणेकरुन ती चित्रपटाच्या ट्रेलर आणि इतर कार्यक्रमांमध्ये परिधान करू शकेल. अशी वागणूक देणाऱ्यांबद्दल मनात कोणतीही नाराजी नसल्याचं हंसिका सांगते.

एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, हंसिका म्हणाली, “असे अनेक डिझायनर होते. दाक्षिणात्य कलाकारांना ते कपडे देण्यास नकार द्यायचे. आम्हाला आमचे कपडे द्यायचे नाहीत, असं म्हणायचे. पण आज ते लोक स्वतःहून येतात आणि म्हणतात की तुमचा कार्यक्रम आहे, तुमच्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच आहे, तर तुम्ही आमचे कपडे घाला. मी पण प्रेमाने होकार देते. कारण माझ्यात आणि त्यांच्यात फरक असायला हवा, नाही का?” असं तिने नमूद केलं.

घडून गेलेल्या त्या गोष्टींबद्दल, डिझायनर्सच्या वागणुकीबद्दल मनात कोणताही राग नसल्याचं हंसिका सांगते. “माझ्याकडे हे डिझायनर स्वतः येतील, असं काम मला करायचं होतं, ते मी केलंय आणि आता ते मला स्टाइल करण्यासाठी स्वतः फोन करतात,” असंही हंसिका म्हणाली.

Story img Loader