आज (२२ जानेवारी रोजी) अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या भव्य कार्यक्रमासाठी अयोध्यानगरी सजली आहे. या सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी, अनेक दिग्गज राजकारणी आणि सिनेसृष्टीतील कलाकार अयोध्येला पोहोचत आहेत. बॉलिवूडमधील बरेच कलाकार या कार्यक्रमासाठी मुंबईतून रवाना झाले आहेत. एकूणच साऱ्या देशभरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

प्रभू रामाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज आहेत. या सगळ्यात चित्रपट विश्वातील लोकही या मंदिराच्या उभारणीत आपापले योगदान देत आहेत. तेज सज्जाच्या ‘हनुमान’ चित्रपटाच्या निर्मात्यांनीही राम मंदिराच्या उद्घाटनासाठी तब्बल २.६६ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी, दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमधून १४ लाख रुपये दान केले होते.

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
like aani subscribe movie on OTT
अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
Raosaheb Danave Beating Karyakarta
Raosaheb Danave Viral Video : फोटो फ्रेममध्ये येणाऱ्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवेंनी लाथाडलं; VIDEO व्हायरल!
property worth rs 494 crore seized in maharashtra
राज्यात आतापर्यंत ४९४ कोटींची संपत्ती जप्त; मुंबई उपनगरात सर्वाधिक मालमत्ता जप्त

आणखी वाचा : “कित्येक पिढ्यांनी…” राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याविषयी व्यक्त होताना अभिनेते मनोज जोशी भावुक

‘हनुमान’च्या निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर दान केलेल्या रकमेचा उल्लेख केला आहे. अयोध्येच्या राम मंदिरासाठी त्यांनी २.६६ कोटी रुपये दिल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की “अयोध्या राम मंदिरासाठी २.६६,४१,०५५ रुपयांची देणगी देण्यात मदत करणाऱ्या लोकांचे आभार आहेत. ‘हनुमान’ चित्रपट पाहून तुम्हीही या अद्भुत उपक्रमाचा भाग होऊ शकता.”

त्या पोस्टमध्ये निर्मात्यांनी पुढे लिहिले की, “तुमच्या खर्च केलेल्या प्रत्येक तिकिटांपैकी ५ रुपये अयोध्येच्या राम मंदिरासाठी जातील. हैदराबादमध्ये या चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमादरम्यान, मेगास्टार चिरंजीवी म्हणाले होते की, प्रत्येक हनुमान तिकिटाचे ५ रुपये राम मंदिराच्या उभारणीसाठी दान केले जातील. दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी ‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना सांगितले की, आमचे निर्माते खूप धार्मिक आहेत. चित्रपटातून उत्तम कमाई होवो अथवा काहीच पैसा हातात न येवो, मात्र प्रत्येक तिकिटातील ५ रुपये राम मंदिरासाठी दान केले जाणार असल्याचा निर्णय त्यांनी आधीच घेतला होता.”