मनमिळावू व्यक्तीमत्व आणि उत्तम अभिनयकौशल्य यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर. ‘उर्फी’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलेल्या मितालीचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे आज तिच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र या सगळ्यांमध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने दिलेल्या शुभेच्छा अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत. सिद्धार्थने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मितालीला शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी चित्रपटसृष्टीचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने मितालीसोबतचा एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोला त्याने दिलेली कॅप्शन अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. यात त्याने प्रेमाने मितालीला tinypanda असं म्हटलं आहे.

वाचा : मिताली मयेकर झाली ‘डॉग कम्युनिकेटर’; प्राण्यांशी त्यांच्याच भाषेत साधते संवाद

दरम्यान, मिताली आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत असून लवकरच ते लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘उर्फी’ चित्रपटातून मितालीनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीनं काम केलं आहे. तर ‘गुलाबजाम’, ‘क्लासमेट’ सारखे अनेक चित्रपट ‘अग्नीहोत्र’, ‘प्रेम हे’ सारख्या मालिकेतून सिद्धार्थनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.