Allu Arjun Birthday : दाक्षिणात्य कलाविश्वातील सर्वात स्टायलिस्ट अभिनेता अशी ओळख असलेल्या अल्लू अर्जुनची लव्हस्टोरी थोडी हटके आहे. अगदी एखाद्या चित्रपटाला साजेशी त्याची लव्हस्टोरी असून आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याचं स्नेहावरील प्रेम ते लग्नापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत.

आधी सनाला बहीण म्हणायचा पती, नंतर लग्नासाठी मौलवीशी मिळून बोलला खोटं; आता सांगितली लव्ह स्टोरी, म्हणाला, “तिने मला…”

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”
ram gopal verma pushpa 2 review
राम गोपाल वर्मा यांनी सांगितला ‘पुष्पा २’चा अनुभव; पोस्ट शेअर करत म्हणाले, “त्याची प्रतिमा…”
why Shatrughan Sinha married Poonam despite his affair with Reena Roy
रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून अल्लू अर्जुनकडे पाहिलं जातं. त्याची क्रेझ केवळ टॉलिवूडमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येदेखील असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे तरुणींमध्ये त्याची कमालीची क्रेझ आहे. मात्र अनेक तरुणींच्या मनावर राज्य करणारा हा अभिनेता मात्र एका लग्नात एका मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्याशीच त्याने लग्नगाठ बांधली.

लग्नाच्या ११ वर्षांनंतर गर्भधारणा, रुग्णालयात दाखल अभिनेत्रीने दिला प्रीमॅच्युअर बाळाला जन्म, प्रकृतीबद्दल माहिती देत म्हणाली, “आम्ही एका…”

एका मित्राच्या लग्नात अल्लू अर्जुन आणि स्नेहाची पहिली भेट झाली. खरंतर पहिल्या भेटीतच हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अल्लूने जेव्हा पहिल्यांदा स्नेहाला पाहिलं तेव्हा तिने त्याच्याकडे पाहून स्मित हास्य केलं. तिचं हे हास्य पाहूनच तो त्याक्षणी तिच्या प्रेमात पडला. विशेष म्हणजे याच लग्नात त्यांनी एकमेकांचे फोन नंबर एक्सचेंज केले. त्यानंतर त्याचं फोनवर बोलणं वाढलं.

तेव्हा स्नेहा नुकतीच अमेरिकेमधून तिची मास्टर्सची डिग्री पूर्ण करुन भारतात परतली होती. स्नेहा हैदराबादमधील एका प्रसिद्ध व्यावसायिकाची मुलगी होती. तर अल्लू अर्जुनदेखील त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होता. त्याने तेलुगू कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं होतं. त्यामुळे स्नेहा त्याला एक सुपरस्टार म्हणूनच ओळखत होती. विशेष म्हणजे अल्लू आणि स्नेहा नात्याला घरातल्यांचा पाठिंबा नव्हता. अल्लूने त्याच्या वडिलांना खूप विनवण्या केल्यानंतर ते स्नेहाच्या घरी अल्लूसाठी लग्नाची मागणी घालायला गेले. मात्र स्नेहाच्या वडिलांनी या लग्नास नकार दिला. परंतु अनेक प्रयत्न, विनवण्या करुन या दोघांनीही कुटुंबियांना लग्नासाठी तयार केलं. त्यानंतर ६ मार्च २०११ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली.

दरम्यान, आज अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त ‘पुष्पा २’ चित्रपटाचा टीझर व त्याचा खास लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. अल्लूच्या लूकला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.

Story img Loader