लोकप्रिय दाक्षिणात्य स्टार अक्किनेनी नागार्जुन यांचा परिचय देण्याची गरज नाही. त्यांचा अभिनय व त्यांची लोकप्रियताच त्यांच्या परिचयासाठी पुरेशी आहे. केवळ दाक्षिणात्य चित्रपटच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहे. नागार्जुन त्यांच्या अभिनयाप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले. नागार्जुन यांची दुसरी पत्नीही एकेकाळी लोकप्रिय अभिनेत्री होती.
“…त्यादिवशी मी अभिनयातून निवृत्ती घेईन,” करीना कपूरचं वक्तव्य
अमाला अक्किनेनी यांचा आज १२ सप्टेंबर रोजी ५६ वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म कोलकात्यात झाला होता. १९८६ ते १९९२ या काळात तमिळ इंडस्ट्रीत त्यांचा जलवा होता. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले होते. ‘उल्लाडक्कम’, ‘लाइफ इज ब्युटीफुल’, ‘वेदम पुदिथु’, ‘पुष्पक विमान’, ‘मैथिली एन्नाई काथली’, ‘निर्णय’, ‘शिवा’, ‘कारवां’ आणि ‘दयावान’ हे त्यांचे सुपरहिट चित्रपट आहेत.
“मला नग्न केलं होतं,” मराठमोळ्या सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “मला खूप तुच्छतेने…”
प्रेमासाठी सोडला अभिनय
अमाला अक्किनेनी अभिनेत्री आहेच, तसेच त्या भरतनाट्यम नृत्यांगना आणि प्राणी कल्याण कार्यकर्त्या देखील आहे. करिअरच्या शिखरावर असताना अमाला नागार्जुनच्या प्रेमात पडल्या आणि करिअर सोडून त्यांच्याशी लग्न केलं. दोघांनी १९९२ मध्ये लग्नगाठ बांधली. नागार्जुन आधीच विवाहित होते. तरीही ते अमालाच्या प्रेमात पडले. दोघांना अखिल अक्किनेनी नावाचा मुलगा आहे. अमाला अभिनेता नागा चैतन्यची सावत्र आई आहे.
२० वर्षांनी पुनरागमन
अमाला यांनी लग्नानंतर अभिनय सोडला, पण २० वर्षांनी पुनरागमन करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते. त्यांनी ‘लाइफ इज ब्युटिफूल’ या चित्रपटातून त्यांनी पुन्हा अभिनयक्षेत्रात पुनरागमन केले. २०१२ मध्ये आलेला हा कमबॅक चित्रपट हिट झाला होता. यासाठी त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले. यानंतर त्यांनी अनेक टीव्ही शो देखील केले.
अमाला अक्किनेनी एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच सामाजिक कार्यासाठीही ओळखल्या जातात. त्या ‘ब्लू क्रॉस ऑफ हैदराबाद’ या एनजीओच्या त्या सह-संस्थापक आहेत.