बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आज (५ जानेवारी) वाढदिवस. वयाच्या १७व्या वर्षी दीपिकाने ग्लॅमरच्या दुनियेत पाऊल ठेवले. पदार्पणातच ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारणा-या दीपिकाला चित्रपटसृष्टीने सहजासहजी स्वीकारले नाही. दाक्षिणात्य उच्चार आणि अभिनयाचा अभाव यामुळे तिला चित्रपटसृष्टीत नाव कमाविण्यासाठी परिश्रम करावे लागले. काही खराब चित्रपट आणि चुकीच्या निर्णयानंतर २००९ साली तिला अखेर चांगला ब्रेक मिळाला. सैफ अली खानसोबतच्या ‘लव्ह आज कल’ चित्रपटातील तिच्या कामाची वाहवा झाली. त्यानंतर आजवर तिने मागे वळून पाहिलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

  • फोटो गॅलरी :  हॅप्पी बर्थडेः दीपिका पदुकोण @२८
  • फोटो गॅलरी : दीपिकाच्या विविध अदा

    आजची आघाडीची अभिनेत्तिरी असलेल्च्याया दीपिका बद्दलच्या काही दुर्मिळ गोष्टी आपण जाणून घेऊया.
    १. बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण आणि उज्ज्वला या दाम्पत्याच्या पोटी कोपनहेगन (डेन्मार्क) येथे दीपिकाचा जन्म झाला.
    २. शालेय वयात तिने राज्यस्तरावरील बॅडमिंटनपटू म्हणून नाव गाजवले. तसेच ती राज्यस्तरावर व्हॉली बॉलसुद्धा खेळली आहे.
    ३. २००६ साली प्रदर्शित झालेल्या एका कन्नड चित्रपटात दीपिकाने ऐश्वर्यासोबत काम केले होते आणि इथूनच तिची अभिनयाची कारकिर्द सुरु झाली.
    ४. गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियासोबतच्या एका व्हिडिओत दीपिकाने काम केले होते. हा व्हिडिओ पाहून फराह खानने तिला ‘ओम शांती ओम’मध्ये घेण्याचे ठरविले.

    ५. पदार्पणातचं दीपिकाने ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून दुहेरी भूमिका साकारली आणि फिल्मफेअर पुरस्कारावर आपले नाव कोरले. 
    ६. ‘चांदनी चौक टू चायना’ चित्रपटाकरिता तिने ‘जुजुत्सु’ या जपानी मार्शल आर्टचे धडे घेतले आणि बॉडी डबलशिवाय चित्रपटातील सर्व स्टंट स्वतः केले होते.
    ७. ‘कॉकटेल’ चित्रपटावेळी निर्माता दिनेश विजनने दीपिकाला दोन्ही स्त्री भूमिकांपैकी आवडले ती भूमिका निवडण्याचे स्वातंत्र्य दिले होते. त्यावर तिने वेरोनिकाची भूमिका स्वीकारली आणि प्रेक्षकांची प्रशंसा मिळविली.
    ८. २००८ साली दीपिकाला भारतातील १०० सुंदरींमध्ये स्थान मिळाले. तर २०१२साली दीपिकाला ‘पिपल’ मासिकाच्या भारतीय आवृत्तीत सर्वाधिक सुंदर भारतीय महिलेचा किताब मिळाला. 
    ९. दीपिकाने आत्तापर्यंत बॉलीवूडमधल्या नावजलेल्या कलाकारांसोबत काम केले आहे. अमिताभ बच्चनपासून ते रजनीकांत या दिग्गज कलाकारांसोबत तिने काम केले आहे. मात्र, आमिर आणि सलमान खानसोबत काम करण्याची संधी तिला अद्याप मिळालेली नाही.
    १०. ‘जब तक है जान’ आणि ‘धूम ३’ या चित्रपटांकरिता दीपिका ही पहिली निवड होती. मात्र, हे दोन्ही चित्रपट तिची प्रतिस्पर्धी कतरिनाच्या खिशात गेले.
    ११. दीपिकाने सलमानसोबतचे तब्बल तीन चित्रपट नाकारले आहेत.- ‘शुद्धी’, ‘सुलतान’ आणि किकमधील आयटम साँग. 