चिमणराव, गंगाधर टिपरे, तात्या विंचू .. अशा अनेक प्रसिद्ध भूमिकांनी रसिकांच्या हृदयावर छाप पाडणारे दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा आज वाढदिवस. दूरदर्शन मालिका, लेखन, चित्रपट, नाटकं अशा सगळ्या माध्यमात सहजतेनं अभिनय करत आपल्या प्रतिभेचा ठसा त्यांनी सर्वांवर उमटवला. वयाच्या ७२व्या वर्षीही ते आपणा सर्वांना त्यांच्या अभिनयाने मंत्रमुग्ध करतात.
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी प्रभावळकरांनी जैवभौतिक शास्त्रात पदव्यूत्तर शिक्षण घेतले. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमधून पदविकाही घेतली त्यांनंतर त्यांनी अनेक वर्षे एका फार्मा कंपनीत नोकरीही केली. हे काम करत असतानात त्यांनी बालनाट्यात भूमिका करायला सुरूवात केली. पण खरया अर्थाने त्यांचा रंगभूमीवरचा प्रवेश विजय तेंडूलकर लिखित ‘लोभ नसावा ही विनंती’ या नाटकातून झाला. या नाटकाचे प्रयोग मोजकेच झाले. पण त्यांच्या भूमिकेला रसिकांनी चांगली दाद दिली. त्यानंतर मात्र त्यांनी आपली नोकरी सोडून पूर्णवेळ या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात त्यांनी रत्नाकर मतकरी यांच्या नाटकात काम करण्यास सुरूवात केली. ‘वासूची सासू’, ‘संध्याछाया’, ‘नातीगोती’, ‘जावई माझा भला’, ‘कलम ३०२’, ‘घर तिघांचे हवे’ या नाटकातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. वैशिष्ट्य म्हणजे या सर्व भूमिका वेगळ्या आहेत. नाटकांसोबतच त्यांनी ‘चिमणराव’ या विनोदी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ‘टुरटुर’ आणि ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या त्यांनी केलेल्या आणखी काही मालिका. यातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. टिपरेआबा तर घराघरात लोकप्रिय झाले. चि. वि. जोशी यांच्या अजरामवर चिमणराव गुंड्याभाऊ या पात्रांवर काढलेल्या त्याच नावाच्या मराठी चित्रपटातील त्यांची भूमिकाही वैशिष्ट्यपूर्ण ठरली. ‘चौकट राजा’, ‘सरकारनामा’, ‘एक डाव भुताचा’, ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’ अशा अनेक चित्रपटातून त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. प्रभावळकरांनी जरी मालिका केल्या असल्या तरी त्यांना नाटक आणि चित्रपटात काम करणेचं जास्त भावते. ते म्हणतात, मालिकांच्या माध्यमातून आपण घराघरांत पोहोचतो आणि कुटुंबाचा एक भाग बनतो, असे असले तरीही मला स्वत:ला चित्रपट आणि नाटक अधिक आवडते. कारण मालिकांमध्ये मार्केटिंगचे वर्चस्व वाढल्याने त्यात कल्पकतेला वाव राहिलेला नाही. प्रभावळकरांचा आणखी एक पैलू म्हणजे ते एक चांगले लेखकही आहेत. त्यानी अनेक वृत्तपत्रातून स्तंभलेखनही केली आहे. विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. ‘गुगली’, ‘हसगत’ या त्यांच्या पुस्तकांना पुरस्कारही मिळाले आहेत. अशा ह्या बहुआयामी दिलीप प्रभावळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आवडती पुस्तके
१) बटाटय़ाची चाळ – पु. ल. देशपांडे
) परममित्र – जयवंत दळवी
३) हास्यचिंतामणी – चिं. वि. जोशी
४) हे सर्व कोठून येते? – विजय तेंडुलकर
५) उकरिज – पी. जी. वुडहाऊस
६) रसगंध – रत्नाकर मतकरी
७) महानिर्वाण- सतीश आळेकर
८) चित्रव्यूह – अरुण खोपकर
९) त्यांची नाटकं – विजय केंकरे
१०) अधोरेखित – सुप्रिया विनोद
नावडती पुस्तके
आवडती पुस्तके जाहीरपणे सांगावीत, नावडती सांगू नयेत असं वाटतं.
दिलीप प्रभावळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
चिमणराव, गंगाधर टिपरे, तात्या विंचू .. अशा अनेक प्रसिद्ध भूमिकांनी रसिकांच्या हृदयावर छाप पाडणारे दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-08-2016 at 01:10 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday dilip prabhavalkar