बॉलिवूडमधील ज्येष्ठ गीतकार, पटकथाकार जावेद अख्तर यांचा आज वाढदिवस, त्यांनी अनेक चित्रपट गाणी लिहली आहेत. सत्तरच्या दशकात प्रसिद्ध होती. जावेद अख्तर एक प्रतिभावान कलाकार म्हणून ओळखले जातातच त्याचबरोबरीने ते आपली मतं ठामपणे मांडत असतात. त्यावरून बऱ्याचदा ते ट्रोल होत असतात. पंडित नेहरूंचे ते मोठे चाहते होते. त्यांच्याबद्दलचा एक किस्सा त्यांनी कार्यक्रमात सांगितला आहे.
जावेद अख्तर अनेक कार्यक्रमात सहभागी होत असतात. नुकतीच त्यांनी लल्लनटॉप ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या विषयावर, खासगी जीवनावर टिपणी केली आहे. त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला स्वाक्षरी घेण्याचा खूप छंद आहे. पंडित नेहरूंची स्वाक्षरी तुम्ही कशी घेतली होतीत? त्यावर ते म्हणाले, मी तेव्हा शाळेत होतो, अलिगढमधील एका शाळेत मी शिकत होतो तेव्हा लायब्ररीच्या उदघाटनासाठी ते येणार होते. तेव्हा आजूबाजूच्या शाळा कॉलेजमधील मुलामुलींना बोलवण्यात आले होते, त्यात मीदेखील होतो आमचा ग्रुप एक गाणेदेखील म्हणणार होता.
“अभिनेत्यांचा धर्म चित्रपटाशी…” ‘पठाण’ वादावर प्रसिद्ध चित्रपटगृहाच्या मालकाची टीकाकारांवर आगपाखड
आम्ही गाणे म्हणणार असल्याने मी साहजिकच स्टेजपाशी होतो. कार्यक्रम संपल्यानंतर ते आपल्या गाडीकडे निघाले, मी धावत त्यांचा पाठलाग केला त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी, माझ्या एका मैत्रिणीने एका कागदावर पंडित नेहरूंचे चित्र काढले होते त्यावर तिरंगा काढला होता. त्यांची गाडी निघणार इतक्यात मी गाडीकडे झेप घेतली आणि खिडकीतून मी माझा कागद त्यांना दिला. त्यांनी लगेचच खिशातून पेन काढून त्यावर स्वाक्षरी केली. तेव्हा मी फक्त १३ वर्षांचा होता.
“टीका करा, आम्ही सावरकर…” शरद पोंक्षेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
जावेद अख्तर मूळचे ग्वालियरचे असून त्यांचे वडीलदेखील उर्दू कवी होते. त्यांनी करियर करण्यासाठी मुंबई गाठली. सुरवातीला त्यांनीदेखील संघर्षाचा सामना करावा लागला होता. ‘हाथी मेरे साथी’ हा त्यांचा पहिला चित्रपट पटकथाकार म्हणून, त्यानंतर ‘यादों की बारात’, ‘डॉन’, ‘दिवार’, ‘शोले’ असे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी जन्माला घातले.