बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांचे नाव ऐकले की लगेच डोळ्यांसमोर त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा दिसू लागतात. परेश यांनी विनोदी भूमिकांपासून खलनायकी भूमिकांपर्यंत आणि घाबरवायला लावणाऱ्या व्यक्तिरेखांपासून ते संस्कारी व्यक्तिरेखेपर्यंत सर्वप्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. आज परेश रावल यांचा ६७ वा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला त्यांच्या सिनेमातील काही नावाजलेल्या वन- लाइनर्सची आठवण करुन देणार आहोत. त्यांचे हे संवीद आजही अनेकांच्या तोंडी असतात.
सध्या परेश त्यांचा आगामी संजू सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. या सिनेमात ते संजय दत्तच्या वडिलांची अर्थात सुनील दत्तची भूमिका साकारत आहेत. नुकताच त्यांचा टायगर जिंदा है सिनेमा प्रदर्शित झाला. परेश रावल यांनी खलनायकी व्यक्तिरेखा जेवढ्या मेहनतीने साकारल्या तेवढ्याच मेहनतीने त्यांनी विनोदी भूमिकाही साकारल्या. परेश रावल यांचा हेरा फेरी, अंदाज अपना अपना, चाची ४२०, जुदाई, चुप चुप के हे त्यातीलच काही सिनेमे. त्यांच्या या सिनेमातील काही वन- लायनर्स आजही त्यांचे चाहते अनेकदा बोलतात.
०१. कौवा कितना भू वॉशिंग मशीन में नहा ले… बगुला नहीं बनता
०२. उठा ले रे बाबा, उठा ले… मेरे को नहीं रे, इन दोनों को उठा ले
०३. चालीस साल की शादीशुदा जिंदगी के बाद.. पती पत्नी को सिर्फ गोली मार सकता है सीटी नहीं
०४. अगर सुबह- सुबह संडास जाना है तो सिंगर बनना पडेगा
०५. जहां धर्म है वहा सत्य के लिए जगह नहीं और जहां सत्य है वहां धर्म की जरुरत ही नहीं है