दाक्षिणात्य अभिनेत्री राय लक्ष्मी तिच्या अप्रतिम अभिनयाने ओळखली जाते. चित्रपटांबरोबरच तिचे ग्लॅमरस लूकही चर्चेत असतात. ती ‘जुली २’ चित्रपटामध्ये इंटिमेट सीन देऊन खूप चर्चेत राहिली होती. इतकंच नाही तर राय लक्ष्मीचं भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीबरोबर अफेअर होतं. तिचं वैयक्तिक आयुष्य बरंच फिल्मी आहे. आज तिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्याबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेऊयात.
राय लक्ष्मीचे अफेअर्स
राय लक्ष्मीने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, प्रेमात फसवणूक झाल्यानंतर तिने स्वत:ला मजबूत बनवले आहे. प्रेमात ती अनलकी राहिली आहे. तिला अनेकदा ब्रेकअपचं दुःख सहन करावं लागलं होतं. ती स्वतःला खूप भावनिक व्यक्ती मानते. तसेच ती कोणावरही सहज विश्वास ठेवते. ती पाच वेळा रिलेशनशिपमध्ये होती आणि प्रत्येक वेळी फसवणूक झाली, असा खुलासा तिने या मुलाखतीत केला होता.
महेंद्रसिंह धोनीबरोबरचं अफेअर
राय लक्ष्मीने भारतीय क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीला डेट केले आहे. ती चेन्नई सुपर किंग्जची ब्रँड अॅम्बेसिडर होती, त्यावेळी धोनी टीमचा कर्णधार होता. दोघांमध्ये जवळीक वाढली होती. त्याबद्दल तिने २०१४ मध्ये एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. त्यावेळी ती धोनीबरोबरच्या नात्याला आयुष्यातील डाग असल्याचं म्हणाली होती. पण, धोनी मात्र कधीच तिच्याबद्दल किंवा तिच्याबरोबरच्या नात्याबद्दल बोलला नव्हता.