सुपरस्टार रजनीकांत याचा आज वाढदिवस. गुरुवारी तो ६३ वर्षांचा झाला. येथे रजनीकांत याच्या अशा १० गोष्टींची माहिती दिली आहे, ज्या तुम्हाला नक्कीच माहिती करून घ्यायला आवडतील.
१. चित्रपटसृष्टीत येण्याआधी रजनीकांत ‘बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून कामाला होता.
२. रजनीकांत याने तमीळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटातसुद्धा काम केले आहे. अद्याप त्याने मराठी चित्रपटात काम केलेले नाही. त्याची मातृभाषा मराठी आहे.
३. कमल हासन हा रजनीकांत याचा आवडता अभिनेता आहे. अनेक चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले आहे.
४. शाळेपासूनच रजनीकांतला अभिनयाची आवड होती. शाळेतील अनेक नाटकांमधून त्यांनी खलनायकाची भूमिका केली आहे. रावणाची भूमिका करायला त्याला फार आवडायचे.
५. प्रत्येक चित्रपटानंतर रजनीकांत काही काळासाठी ब्रेक घेऊन हिमालयाच्या भेटीला जातो.
6. त्याच्या प्रत्येक हिमालय भेटीत हृषिकेश येथील हॉटेलमध्ये त्यांची नेहमीची ठरलेली खोलीच त्याला दिली जाते.
७. असे सांगितले जाते की लहान असताना रजनीकांत त्याच्या भावाला गोष्टी आणि आई जक्कुबाईचे किस्से सांगण्यासाठी त्रास देत असत.
८. रजनीकांत दररोज सकाळी ५ वाजता उठतो. ध्यानधारणा करतो. फिटनेससाठी संध्याकाळी तासभर चालतो.
९. रजनीकांत याला त्याच्या फार्म-हाऊसवर राहायला आवडत असून, क्वचित प्रसंगी तो बॉइज गार्डन येथील त्याच्या घरी राहतो.
१०. बॉइज गार्डन येथील घरात पूजा आणि ध्यानधारणेसाठी वास्तूशास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे एक खोली बनवून घेतली आहे. बऱ्याच वेळा ते या खोलीत ध्यानधारणा आणि प्रार्थना करण्यात आपला वेळ घालवतो.

Story img Loader