दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू पसरवणारे सुपरस्टार म्हणून रजनीकांत यांना ओळखले जाते. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस. रजनीकांत यांचे जगभरात असंख्य चाहते आहेत. त्यांचा पडद्यावरील अभिनय, डायलॉग बोलण्याची शैली, चालण्याची स्टाईलचे लाखो चाहते आहेत. रजनीकांत हे त्यांच्या चाहत्यांचे भरभरून मनोरंजन करत असतात. त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना वर्षभरापूर्वी ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ ने गौरवण्यात आले. यावेळी त्यांनी अनेकांचे आभार मानले होते.

रजनीकांत यांनी १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अबूर्वा रांगणगल’ या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती. तर हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘अंधा कानून’ हा त्यांचा पहिला चित्रपट. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी रजनीकांत ‘बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून कामाला होते. मात्र अभिनयाची आवड असणाऱ्या रजनीकांत यांना एका दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मात्र त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. आजवरच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे.
आणखी वाचा : “घरी परतलो”, सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयातून डिस्चार्ज

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
raj Rajshekhar emotional letter written to grandfather Rajshekhar
“प्रिय आजोबा…”, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर यांच्या नातवाने लिहिलं भावुक पत्र, म्हणाला…
isha deol reveal dharmendra did not like short dress for daughters
“वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालायचो”, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेला खुलासा; म्हणालेली, “त्यांना मी १८ व्या वर्षी…”
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”

रजनीकांत यांना वर्षभरापूर्वी त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ ने गौरवण्यात आले. रजनीकांत यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणादरम्यान अनेकांचे आभार मानले. यावेळी त्यांनी हा पुरस्कार गुरु के. बालाचंद्र यांना अर्पण केला. यावेळी ते म्हणाले, “सिनेसृष्टीत महत्वाची कामगिरी करणाऱ्या अभिनेत्याला दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जाते. चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचा मला फार आनंद आहे. याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो. मी हा पुरस्कार माझे गुरु के. बालाचंद्र यांना समर्पित करतो.

मला या क्षणी काही लोकांचे आभार व्यक्त करायचे आहेत ज्यांनी मला या संपूर्ण प्रवासात कायम साथ दिली. माझे भाऊ सत्यनारायण गायकवाड हे मला माझ्या वडिलांसारखे आहेत. त्यांनी मला उत्तम संस्कार आणि अध्यात्म्याची शिकवण देऊन माझी वाढ केली. याबरोबरच कर्नाटकातील माझा मित्र आणि सहकारी राजबहादूर जो बस ड्रायव्हर आहे. पण मी त्याचेही आभार मानू इच्छितो. कारण मी जेव्हा बसमध्ये कंडक्टर होतो, त्यावेळी त्यानेच माझ्यातील अभिनय कौशल्य ओळखले. त्यानेच मला चित्रपटात जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. या सर्वांना मी माझा हा पुरस्कार समर्पित करतो.

इतकंच नव्हे तर सर्व निर्माते, दिग्दर्शक, सहकलाकार, टेक्निशियन्स, वितरक, प्रदर्शक, मीडिया आणि माझे चाहते, तामिळ भाषिक लोक या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. त्यांच्याशिवाय मी काहीही नाही,” असेही त्यांनी यावेळी म्हटले होते.