सुपरस्टार रजनीकांत हे आज ६४वा वाढदिवस साजरा करत आहेत. रजनीकांत हे तामिळ चित्रपटातील दैवी नाव. पडद्यावरील त्यांची स्टाइल, त्याचा ऍटिट्यूड यांनी वेडावलेल्या चाहत्यांची संख्या लक्षणीय आहे. रजनीकांत यांनी पहिल्यांदा १९७५ मध्ये आलेल्या ‘अबूर्वा रांगणगल’ या चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. त्यानंतर रजनीकांत नावाचे वादळच दाक्षिणात्य चित्रपटात आले जे आजतायगत घोंगावत आहे. दाक्षिणात्यसोबतच त्यांनी ब-याच हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे. आतापर्यंत त्यानी दीडशेहूनही अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘अंधा कानून’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यांच्या वाढदिवसानिमित्त येथे त्यांच्या अशा १० गोष्टींची माहिती दिली आहे, ज्या तुम्हाला नक्कीच माहिती करून घ्यायला आवडतील.
१. चित्रपटसृष्टीत येण्याआधी रजनीकांत ‘बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून कामाला होता.
२. रजनीकांत याने तमीळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटातसुद्धा काम केले आहे. अद्याप त्याने मराठी चित्रपटात काम केलेले नाही. त्याची मातृभाषा मराठी आहे.
३. कमल हासन हा रजनीकांत याचा आवडता अभिनेता आहे. अनेक चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले आहे.
४. शाळेपासूनच रजनीकांतला अभिनयाची आवड होती. शाळेतील अनेक नाटकांमधून त्यांनी खलनायकाची भूमिका केली आहे. रावणाची भूमिका करायला त्याला फार आवडायचे.
५. प्रत्येक चित्रपटानंतर रजनीकांत काही काळासाठी ब्रेक घेऊन हिमालयाच्या भेटीला जातो.
६. त्याच्या प्रत्येक हिमालय भेटीत हृषिकेश येथील हॉटेलमध्ये त्यांची नेहमीची ठरलेली खोलीच त्याला दिली जाते.
७. असे सांगितले जाते की लहान असताना रजनीकांत त्याच्या भावाला गोष्टी आणि आई जक्कुबाईचे किस्से सांगण्यासाठी त्रास देत असत.
८. रजनीकांत दररोज सकाळी ५ वाजता उठतो. ध्यानधारणा करतो. फिटनेससाठी संध्याकाळी तासभर चालतो.
९. रजनीकांत याला त्याच्या फार्म-हाऊसवर राहायला आवडत असून, क्वचित प्रसंगी तो बॉइज गार्डन येथील त्याच्या घरी राहतो.
१०. बॉइज गार्डन येथील घरात पूजा आणि ध्यानधारणेसाठी वास्तूशास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे एक खोली बनवून घेतली आहे. बऱ्याच वेळा ते या खोलीत ध्यानधारणा आणि प्रार्थना करण्यात आपला वेळ घालवतो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या पानावरील ‘प्रतिक्रिया येथे नोंदवा’ या सुविधेचा वापर करा.
हॅपी बर्थडे रजनीकांत! : जाणून घ्या रजनीकांतबद्दलच्या दहा गोष्टी
सुपरस्टार रजनीकांत हे आज ६४वा वाढदिवस साजरा करत आहेत. रजनीकांत हे तामिळ चित्रपटातील दैवी नाव.
First published on: 12-12-2014 at 10:20 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday rajnikant 10 unknown facts of rajnikant