दाक्षिणात्य चित्रपटामधील आघाडीची अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना. रश्मिकाचे आज जगभरात चाहते आहेत. ‘पुष्पा’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेली ‘श्रीवल्ली’ खरं तर नॅशनल क्रश आहे. निखळ सौंदर्य आणि अभिनयाने चाहत्यांना भूरळ घालणाऱ्या या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. ५ एप्रिल १९९६मध्ये रश्मिकाचा जन्म झाला. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या रश्मिकाने अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णही केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज तिच्या वाढदिवसानिमित्त काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. रश्मिका तिच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. तिचं कलाक्षेत्रामधील काही व्यक्तींशी नाव जोडलं गेलं. रश्मिका तिच्या पहिल्याच चित्रपटादरम्यान एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती. त्यावेळी रश्मिकाच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. इतकंच नव्हे तर तिचं हे नातं लग्नापर्यंत पोहोचलं होतं.

आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाचा पहिलाच चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर होता. यादरम्यान ती तिच्यापेक्षा १३ वर्षांनी मोठा असलेला अभिनेता रक्षित शेट्टीच्या प्रेमामध्ये वेडी झाली होती. इतकंच नव्हे तर दोघांनी लग्न करण्याचा निर्णयही घेतला होता. रश्मिका व रक्षितने साखरपुडाही केला. मात्र काही कारणास्तव या नात्याचा दी एण्ड झाला.

आणखी वाचा – दोन मुलं, अफेअर, १३ वर्षांचा संसार मोडला अन्…; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचा उल्लेख करत शबाना म्हणाल्या, “प्रेम होतं म्हणून…”

साखरपुड्यानंतर रश्मिका व रक्षितच्या नात्यामध्ये वादाची ठिणगी पडली. दरम्यान दोघांनी एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. याव्यतिरिक्त रश्मिकाला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं. म्हणूनच तिने रक्षितपासून दूर राहणयाचा निर्णय घेतला असंही बोललं जातं. मात्र अद्यापही दोघांनी त्यांच्या नात्याबाबत कधीच भाष्य केलं नाही.