दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ आमिर खानच्या ‘रंग दे बसंती’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. हिंदीसोबतच साऊथ सिनेमातही त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. पण, त्याच्या फिल्मी करिअरपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्याची खूप चर्चा झाली. आज सिद्धार्थचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने त्याच्या लव्ह लाइफबद्दल जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – आर माधवनचा मुलगा वेदांतची कौतुकास्पद कामगिरी! एकाच स्पर्धेत देशासाठी जिंकली पाच सुवर्ण पदकं

सिद्धार्थचा जन्म १७ एप्रिल १९७९ रोजी चेन्नई येथे झाला. त्याने प्रेमविवाह केला होता, पण अवघ्या चार वर्षांत तो पत्नीपासून विभक्त झाला, याशिवाय त्याचे तीन अभिनेत्रींशी अफेअर होते, पण तेही फार काळ टिकले नाही. सध्या तो अभिनेत्री अदिती राव हैदरीबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातंय. आज आपण त्याचा एक घटस्फोट आणि तीन ब्रेकअपबद्दल जाणून घेणार आहोत.

हेही वाचा – Video: भर कार्यक्रमात गर्भवती सना खानला पतीने दिलेली वागणूक पाहून नेटकऱ्यांचा संताप, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्पष्टीकरण देत म्हणाली…

तमिळ अभिनेता सिद्धार्थचा विवाह मेघना नारायणशी झाला होता. दोघांनी २००३ मध्ये लग्न केले होते. त्याने मेघनाशी प्रेमविवाह केला होता. ती दिल्लीत त्याच्या घराच्या शेजारी राहायची. दोघांमध्ये प्रेम फुलले आणि नंतर त्यांनी लग्न केले. पण काही काळानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि अवघ्या ४ वर्षांत म्हणजे २००७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या घटस्फोटाचे कारण सिद्धार्थची अभिनेत्री सोहा अली खानशी वाढती जवळीक होती, असं म्हटलं जातं.

हेही वाचा – तब्बू आडनाव का लावत नाही? खुलासा करत म्हणालेली, “मला वडिलांच्या..”

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खानची बहीण सोहा अली खानची सिद्धार्थच्या आयुष्यात एंट्री झाली होती. ‘रंग दे बसंती’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात जवळीक निर्माण झाली होती, पण त्यांचं कथित नातं फार काळ टिकलं नाही आणि लवकरच ते वेगळे झाले. सोहाशी ब्रेकअप झाल्यानंतर सिद्धार्थचे नाव अभिनेत्री श्रुती हसनशी जोडले गेले. दोघेही ‘ओह माय फ्रेंड’मध्ये काम करत होते आणि याच दरम्यान त्यांच्यात प्रेम झाल्याचं बोललं जातं. इतकंच नव्हे तर २०११ मध्ये ते लिव्ह इनमध्ये राहू लागले होते, या नात्याला घरच्यांची मंजुरी होती, पण नंतर दोघांमध्ये भांडणं झाली व ते वेगळे झाले.

श्रुतीशी ब्रेकअपनंतर सिद्धार्थचे नाव समांथाशी जोडले गेले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांना लग्न करून सेटल व्हायचे होते आणि लग्नाची तयारीही सुरू झाली होती, पण अचानक त्यांचं नातं तुटल्याची बातमी आली. सिद्धार्थ आणि समांथाच्या ब्रेकअपचे कारण कन्नड अभिनेत्री दीपा सानिधी असल्याचं म्हटलं जातं. सिद्धार्थची तिच्याशी वाढती जवळीक समांथाशी ब्रेकअपला कारणीभूत ठरली होती. दरम्यानच्या काळात सिंगल असलेला सिद्धार्थ सध्या अदिती राव हैदरीला डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. पण, त्यांनी अधिकृतपणे नात्याबद्दल काहीही भाष्य केलेलं नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday siddharth love marriage divorce affairs with samantha shruti haasan soha ali khan dating aditi rao hydari hrc