भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचा आज वाढदिवस. जगभरातील क्रिकेटप्रेमींकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. क्रिकेटविश्वातील अनेक खेळाडू तसेच बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटींनीही विराटला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहे.
अनुष्कानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर विराटसमवेत आपला फोटो पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. पण या शुभेच्छा देताना तिनं देवाचे आभार मानले आहे. तो जन्मला म्हणून मी देवाचे आभार मानते असं लिहित तिनं विराटसोबतचा फोटो शेअर केला आहे. विराटसाठी लांबलचक पोस्ट न लिहिता तिनं लिहिलेलं छोटसं वाक्य खूप काही सांगून गेलं. विराट कोहली सध्या वाढदिवस साजरा करण्यासाठी पत्नी अनुष्कासोबत उत्तराखंडमध्ये दाखल झाला आहे. सध्या विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत विराटला विश्रांती देण्यात आलेली आहे, या सुट्टीचा फायदा घेत सध्या उत्तराखंडाच्या निसर्गरम्य ठिकाणी ते दोघंही पोहचले आहेत. ते एका आश्रमात राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Thank God for his birth pic.twitter.com/SzeodVBzum
— Anushka Sharma (@AnushkaSharma) November 5, 2018
विराटचा हा ३० वा वाढदिवस आहे. गेल्याच वर्षी विराट- अनुष्का विवाहबंधनात अडकले. बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातलं हे सर्वात प्रसिद्ध जोडपं आहे.