मराठीत यशस्वी ठरलेल्या ‘टाइम प्लीज’ या लोकप्रिय चित्रपटानंतर एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटने हाती घेतलेल्या ‘हॅप्पी जर्नी’ या नवीन चित्रपटामध्ये अतुल कुलकर्णी आणि प्रिया बापट ही जोडी दिसणार आहे. या दोघांची नावे अंतिम झाल्यामुळे चित्रपटसृष्टीत एव्हरेस्टच्या नवीन चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटासाठी आणखी एका नवीन चेहर्‍याचा शोध सुरू होता त्यांचा हा शोध संपला असून, तिस-या पात्रासाठी अभिनेत्री पल्लवी सुभाषची निवड करण्यात आली आहे.
या चित्रपटात तीन मध्यवर्ती भूमिका आहेत. याचे चित्रीकरण पुणे येथील विविध ठिकाणी आणि गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात दोन सत्रांमध्ये चित्रीत होणार आहे. या चित्रपटाच्या विविध बाजू सांभाळण्यासाठी युवा आणि ऊर्जाभर्‍या चमूची निवड केली जाणार आहे. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे संजय छाब्रिया म्हणाले, “हा एक युवा, समकालीन आणि आधुनिक असा चित्रपट असून तो युवा पिढील साद घालेल. तो संपूर्ण नव्या धाटणीचा चित्रपट असून प्रेक्षक आमच्या या वेगळ्या प्रयत्नाला प्रतिसाद देतील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.”

Story img Loader