शाहरूख खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, सोनू सूद, बोमन इराणी आणि व्हिवान शहा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हॅप्पी न्यू इयर’ चित्रपटाचा पहिला पोस्टर आज (२ जानेवारी) प्रदर्शित करण्यात आला. बॉलिवूडच्या स्टार मंडळींची मोठी फौज घेवून दिग्दर्शक फराह खान ‘हॅप्पी न्यू इयर’ चित्रपट साकारत आहे. रेड चिली एन्टरटेन्मेंट प्रा. लि. या संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
दरम्यान, निर्मात्यांनी प्रदर्शनपूर्व प्रचारासाठी चित्रपटाच्या पोस्टरची समाज माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर प्रसिध्दी केली आहे. अद्याप पर्यंत कोणत्याही चित्रपटाची अशा प्रकारे प्रसिध्दी करण्यात आली नसल्याचा दावा ‘हॅप्पी न्यू इयर’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला आहे. चित्रपटातील सर्व प्रमुख अभिनेते या प्रसिध्दी मोहिमेत भाग घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सध्या ‘हॅप्पी न्यू इयर’ चित्रपट निर्मिती प्रक्रियेमध्ये आहे.  

Story img Loader