बॉक्स ऑफिसवर तीनशे कोटींचा गल्ला जमवणारा फराह खान दिग्दर्शित ‘हॅप्पी न्यू इयर’ हा अतिशय सुमार दर्जाचा चित्रपट असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी व्यक्त केले आहे. शाहरूख खान, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, सोनू सूद आणि दीपिका पादूकोनसारख्या तगड्या कलाकारांची भूमिका असलेला ‘हॅप्पी न्यू इयर’ चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला.
या चित्रपटातील अभिषेक बच्चनचे काम जया बच्चन यांच्या पचनी पडलेले नाही. अभिषेक हा खूप चांगला अभिनेता आहे, परंतु चित्रपटात त्याने स्वतःचा विदुषक बनवून घेतल्याचं जया बच्चन यांचं म्हणणं आहे. दरम्यान, अशी बावळट भूमिका पदयावर साकारणं हेदेखिल एक आव्हान असतं, अशी पुस्तीही त्यांनी पुढे जोडली.
एकिकडे जया बच्चन यांना हा चित्रपट सुमार दर्जाचा वाटत असताना बॉलीवूड शहेनशा अमिताभ बच्चन मात्र या चित्रपटाच्या प्रेमात आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा