बॉलीवूडपटांच्या प्रसिध्दीसाठी सोशल मीडियाचा हल्ली जास्त प्रमाणावर वापर होऊ लागला आहे. अगदी चित्रपटाच्या प्रोमोजपासूनची प्रत्येक घडामोड फेसबुक आणि ट्विटरवर धडक ते. केवळ चित्रपटच नव्हे तर चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी ट्विटरचा सर्रास वापर केला जातो. मात्र, शाहरूख खानच्या आगामी ‘हॅप्पी न्यू इयर’ चित्रपटाने थेट ट्विटरच्या मुख्यालयातच प्रसिध्दी करण्याची मोहिम फत्ते केली आहे.
फराह खान दिग्दर्शित ‘हॅप्पी न्यू इयर’ चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी शाहरूखने चांगलीच कंबर कसली आहे. १५० कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी संपूर्ण टीमबरोबर त्याने जगभर ‘स्लॅम द टूर’ नावाचा दौरा करत आधीच चांगली प्रसिध्दी केली आहे. शाहरूख, अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण, बोमन इराणी, सोनू सूद आणि विवान शाह अशी मोठी फौज आहे. त्यामुळे या सगळ्यांनाच घेऊन शाहरूखने ‘स्लॅम द टूर’ म्हणत चित्रपटातील गाणी सगळीकडे पोहोचवली आहेत. शिवाय, सोशल मीडियावर चित्रपटातील सगळे कलाकार प्रसिध्दी करत आहेत. यावेळी चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी शाहरूखने ट्विटरचा जास्तीत जास्त वापर केला आहे. चित्रपटातील कलाकारांनी आपल्या ट्विटर अकाऊंटचे नावही चित्रपटातील नावांप्रमाणे ठेवून प्रसिध्दी केली होती. या सगळ्या गोष्टी कमी पडल्या की काय कोण जाणे.. या संपूर्ण टीमने थेट सॅनफ्रासिस्को येथील ट्विटरचे मुख्यालय गाठले. ट्विटरच्या मुख्यालयात जाऊन प्रसिध्दी करणारा ‘हॅप्पी न्यू इयर’ हा पहिलाच बॉलीवूडपट ठरला आहे. तिथे जाऊन त्यांनी त्यांची स्वाक्षरी असलेले चित्रपटांचे पोस्टर्स, ट्रेलर्स चाहत्यांना भेट म्हणून दिले आहेत. एवढेच नाही तर आत्तापर्यंत ‘इंडीवाले’ म्हणून प्रसिध्द झालेल्या चित्रपटातील त्यांच्या टीमच्या नावाने त्यांनी चाहत्यांशी संवादही साधला आहे.
या एकूणच ‘ट्विटर’ मोहिमेबद्दल आपण फारच उत्साही होतो, असे सांगणाऱ्या दिग्दर्शक फराह खानने त्यांच्या तिथल्या गंमतीजमतींची छायाचित्रेही लगेचच चाहत्यांसाठी पुन्हा ट्विटरवरच उपलब्ध करून दिली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा