आज ५ सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन…आज संपूर्ण देश आपल्या गुरूंची आठवण काढत आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत. यात बॉलिवूडकर सुद्धा मागे नाहीत. बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपआपल्या गुरूंची आठवण काढत शिक्षक दिनावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. आजच्या शिक्षक दिनी पाहूयात बॉलिवूडकरांचा शिक्षक दिन.

बॉलिवूडची ‘धक धक’ गर्ल माधुरी दीक्षितने तिच्या ट्विटर अकाउंटवर शिक्षक दिनाची एक पोस्ट शेअर केली आहे. भारताचे दूसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा फोटो शेअर करत तिने हे ट्विट शेअर केलंय. यात तिने लिहिलंय, “माझ्या आयुष्यात मला योग्य शिकवण दिल्याबद्दल आजच्या शिक्षक दिनाच्या खास दिवशी मी त्या सर्व गुरूंचे आभार मानते. चला या खास दिवसाला साजरा करूया आणि आपल्या शिक्षकांप्रति आभार व्यक्त करूया. #HappyTeachersDay.”

दिग्दर्शक सुभाष घई यांनी लिहिलं, “एक विद्यार्थी जो आपल्या गुरूंकडून मिळालेली शिकवण घेतो आणि पुढे जाऊन इतरांना शिकवत तो गुरू बनतो. शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांवर आशिर्वाद कायम राहू देत.”

तापसी पन्नूने सुद्धा शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत लिहिलं, “प्रत्येक वेड्या खेळाडूच्या मागे एक वेडा कोच असतो.” यात तापसीने तिचे गुरू @NooshinKhadeer यांचा उल्लेख करत त्यांचे आभार मानले आणि शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा :सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी ऐकून चाहती कोमात; डॉक्टरांनी ट्वीट करत दिली ‘ही’ माहिती

हेमा मालिनी यांनी लिहिलंय, “आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला मार्गदर्शन करत खूप काही शिकवलं अशा सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.”


अभिनेता सुनिल शेट्टी याने लिहिलं, “ज्यांनी मला आयुष्याचे धडे शिकवले त्या सर्व गुरूंचे खूप खूप आभार. प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी शिक्षक दिन असतो. आजचा दिवस या सर्व गुरूंचे आभार मानून आणि सलाम करून साजरा करूया.”


नुकतंच ‘शेरशाह’ चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री कियारा आडवाणी हिने लिहिलंय, “आज आम्ही जे काही आहोत, इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा देणारे आणि आम्हाला घडवणाऱ्या सर्व गुरूंना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.”

आणखी वाचा : माधुरी दीक्षित आणि उर्मिला मातोंडकर यांच्या जबरदस्त डान्सचा जलवा; व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेत्री ईशा देओलने आई हेमा मालिनी यांच्यासोबत तिच्या लहानपणीचा फोटो शेअर करत लिहिलं, “एका छोट्याश्या डान्सरच्या पहिल्या पावलांपासून ते आई बनण्यापर्यंत, हे सारं काही तुमच्यामुळेच मिळवू शकले. ज्ञान, संस्कार आणि अनुशासन हे मी तुमच्याकडून शिकलेय. तुमच्या रूपातून मला देवाचा आशिर्वाद मिळालाय. माझी आई माझी पहिली गुरू.”

आणखी वाचा : सिद्धार्थ आणि शेहनाजचा झाला होता साखरपुडा; येत्या डिसेंबरमध्ये करणार होते लग्न

युनेस्कोने ५ ऑक्टोबर हा दिवस आंतराराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून जाहीर केला. १९८५ मध्ये १० सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून त्याला मान्यता मिळाली. साधरण २० व्या शतकापासून शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा जगभरात सुरू झाली. जागतिक स्तरावर वेगवेगळ्या दिवशी का होईना, पण हा दिवस साजरा करतात.