गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यात आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. अभिजीत देशपांडे दिग्दर्शित आणि झी स्टुडिओची निर्मिती असलेला ‘हर हर महादेव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा आणखी एक टीझर प्रदर्शित झाला आहे. सध्या या टीझरची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आणि जगात कुठेही असणाऱ्या मराठी माणसाला सतत प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या अखंड ऊर्जेला सतत प्रवाही ठेवणारी गोष्ट म्हणजे ‘हर हर महादेव’ ही शिवगर्जना! छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्यांची थोरवी याचं आकर्षण, कुतूहल आजही अनेकांच्या चर्चेचा, अभ्यासाचा विषय असतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर भारतीय भाषिकही महाराजांच्या कार्यावर संशोधन करतात. महाराजांचा हाच महिमा ‘हर हर महादेव’ या चित्रपटातून भव्य दिव्य स्वरूपात सर्वांसमोर येणार आहे.

Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…
cid aahat serials in marathi
‘सीआयडी’ आणि ‘आहट’ मालिकांचा थरार आता मराठीत; कधी आणि कुठे बघाल या मालिका, जाणून घ्या…

‘ही माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे’, मराठी चित्रपटाच्या टीझरला राज ठाकरेंचा आवाज

हर हर महादेव या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात भगव्या झेंड्याने होत असल्याचे पाहायला मिळत आहे. “सह्याद्रीला पूर्व एकच, अटकेपार सूर्य एकच, अखंड स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपतींचा शिवमंत्र एकच…हर हर महादेव”, अशा ओळी या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट एकाच दिवशी मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मराठी चित्रपटांच्या इतिहासात आजवर कधीही न घडलेली अशी ही घटना हर हर महादेवच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.

अभिजीत देशपांडे यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. त्यासोबतच ते हा चित्रपट दिग्दर्शितही करत आहेत. येत्या दिवाळीमध्ये हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. दक्षिणेकडील चित्रपटांचे यश, हिंदी भाषेत डब होऊन सर्वदूर पोहोचलेला दाक्षिणात्य चित्रपट आज सर्वांवर गारुड करण्यात यशस्वी झाला आहे. मराठी चित्रपट असा भव्य दिव्य कधी बनणार, तो इतर भाषांमध्ये कधी प्रदर्शित होणार, याबद्दलच्या चर्चा आपण नेहमी करतो किंवा ऐकतो. या प्रश्नांना आणि चर्चांना आता ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या माध्यमातून एक सकारात्मक उत्तर मिळणार आहे.

“हुं सुरत माटा गयवानू…”, कुशल बद्रिकेची गुजराती भाषेतील ‘ती’ पोस्ट चर्चेत

“छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य इतकं महान आणि भव्य आहे की ते फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहू शकत नाही. महाराजांची युद्धनीती ,संघटन कौशल्य जगभरात अभ्यासलं जातं आहे. आज इतर भाषांमधील काल्पनिक गोष्टी आपल्याला मोहवून टाकत आहेत. त्यामुळे आपला खरा, प्रेरणादायी आणि देदीप्यमान असा इतिहास तेवढ्याच भव्यतेने जगासमोर आलाच पाहिजे ही भावना आमच्या मनात होती. या भावनेतूनच आम्ही हर हर महादेव सर्व भारतात पाच भाषांमध्ये प्रदर्शित करायचं ठरवलं आहे. या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याची व्हिएफएक्स टीम. अनेक हॉलिवूडपटांवर काम करणारे व्हिएफएक्स तंत्रज्ञ यावर काम करत असून तब्बल 400 हून अधिक तंत्रज्ञांचा यात समावेश आहे.” असे झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी यांनी म्हटले.