‘हर हर शंभो’ गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली गायिका फरमानी नाझ सध्या वादात अडकत चालली आहे. तिचे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या गाण्याचे मूळ कॉपी राईट असलेल्या जितू शर्माने तिच्यावर गाणे चोरल्याचा आरोप केला आहे. हा वाद संपत नाही तोपर्यंत तिने आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे तिला चांगलेच ट्रोल केले जात आहे. नुकतंच तिने ट्रोलर्सला खडे बोल सुनावले आहेत.
नुकतंच ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना फरमानी नाझ म्हणाली, आम्ही कोणालाच दुखावत नाही किंवा कोणतेही चुकीचे काम करत नाही. आम्हा कलाकारांना कोणताही धर्म नसतो अशी हिंमत प्रत्येकाने ठेवली पाहिजे. ते ऐकणारे वेगवेगळ्या धर्माचे असतात. देशात प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे.
“तेव्हा मला ट्रोल केलं जातं” अमिताभ बच्चन यांनी सांगितला ‘तो’ अनुभव
फरमानी यांना मुलाखतीत विचारण्यात आले की, अनेक मौलाना असे मानतात की गाणे आणि नृत्य करणे इस्लाम धर्मामध्ये चांगले मानले जात नाही. याकडे तू कसे बघतेस? यावर आपलं मत मांडताना फरमानी म्हणाली, “वेळ ही अशी गोष्ट आहे, जी सर्व काही करून दाखवते. पण कलेचा संबंध कोणत्याही धर्माशी जोडणे चुकीचे आहे. लोक काही गोष्टी स्वतःच्या आनंदाने करतात. मी अस्वस्थ असताना मला कोणीही हा प्रश्न विचारला नाही. पण आज जेव्हा मी गाणी गाऊ लागली आणि पुढे जाऊ लागले तेव्हा मी त्यांच्या नजरेत आले.
“मी जास्त विचार करत नाही आणि मी कोणाला वाईट ही म्हणत नाही. मी सर्व धर्मांचा आदर करते. मी गाणी गाते, गात राहीन. आमचे काम आहे चांगली भजने आणि गाणी गात राहणं”, असेही फरमानीने म्हटले.
दरम्यान ‘हर हर शंभू’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच गाजतंय. या गाण्यावर अनेक रील्सही बनवल्या जात आहेत. मुस्लिम धर्मीय असून शिव भजन गायल्याबद्दल तिला ट्रोल करण्यात येत आहे. ‘हर हर शंभू’ फेम फरमानी नाझने युट्युबवर आजवर अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहे. पण या भक्तिगीतामुळे तिला इतकी प्रसिद्धी मिळेल याचा तिने कधीही विचार केला नसेल. इन्स्टाग्राम आणि युट्युबवर तिची गाणी चर्चेत आहेत. फरमानी नाझ ही इंडियन आयडॉल १२ च्या पर्वामध्ये सहभागी झाली होती. ती मूळची उत्तर प्रदेशात वास्तव्यास आहे