टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि दिग्गज स्पिनर हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसरा यांना चार दिवसांपूर्वीच मुलगा झाला. हरभजनने स्वत: ट्वीट करत ही गोड बातमी दिली. त्यानंतर आज बाळाची आई अभिनेत्री गीता बसरा हिला डिस्चार्ज देण्यात आला असून चार दिवसांचं बाळ आणि आई दोघेही घरी परतले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी हिनाया सुद्धा दिसून आली.

हरभजन सिंहची पत्नी अभिनेत्री गीता बसरा हिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. यावेळी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना चार दिवसांच्या बाळासह संपूर्ण कुटुंबाला स्पॉट करण्यात आलं. मात्र, यावेळी नव्याने जन्म घेतलेल्या लहान बाळाची झलक मात्र दिसली नाही. पण नव्यानेच आई बनलेली गीता बसरा फोटोग्राफर्ससमोर वेगवेगळ्या पोज देताना दिसून आली. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा फ्रॉक परिधान केला होता. तसंच सुरक्षिततेची काळजी घेत चेहऱ्यावर मास्क देखील लावलेला होता. यावेळी ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसून येत होती.

आपल्या बाळाला घरी आणल्याचा आनंदात गीता बसरा हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये बाळाच्या आगमनासाठीची तयारी केलेली दिसून येतेय. ‘Born in 2021’ असं लिहिलेला एक नाईटसूट, टेडी बियर, फुगे अशी सजावट केलेली दिसून येतेय. नाईटसूटवर Baby Plaha असं लिहिलेलं आहे. बाळाचे नाव अजून जाहिर केलं नसल्याने यावर लिहिलेलं Baby Plaha म्हणजे काय या विचारात फॅन्स पडले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Geeta Basra (@geetabasra)


हरभजन सिंग आणि गीता बसरा यांनी 29 ऑक्टोबर 2015 मध्ये लग्न केले. 2016 मध्ये त्यांनी मुलगी हिनाया जन्म दिला. हिनाया आता 5 वर्षांची आहे. त्यानंतर आता दुसऱ्यांदा आई-बाबा बनून त्यांनी गोंडस मुलाला जन्म दिलाय.

Story img Loader