आज महाशिवरात्री त्यानिमित्ताने संपूर्ण देशभरात शंकराची पूजा केली जाते. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. तर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर महाशिवरात्री निमित्ताने फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. या सगळ्यात भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने एका वेगळ्या अंदाजात सगळ्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हरभजनने त्याच्या हातावर महादेवचा टॅट्यू काढला आहे. त्याचा व्हिडीओ हरभजनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला महामृत्युंजय मंत्र सुरु आहे. हा व्हिडीओ शेअर करत “शिव सत्य है, शिव अनंत है। शिव अनादि है, शिव भगवंत है, शिव ओंकार है, शिव ब्रह्म हैं। शिव शक्ति है, शिव भक्ति है… महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा”, असे कॅप्शन हरभजनने दिले आहे. त्याने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…
आणखी वाचा : “Arrange Marriage म्हणजे मटका, मी जर लग्न केल तर…”; प्राजक्ता माळीचे वक्तव्य चर्चेत
दरम्यान, या आधी महाशिवरात्री निमित्ताने अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. पण सगळ्यांचे लक्ष हे अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांच्या लेकीने वेधले आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.