श्री षण्मुखानंद फाईन आर्टस् आणि संगीत सभेतर्फे २७ जुलै रोजी मुंबईत माटुंगा (पूर्व) येथील षण्मुखानंद सभागृहात ‘हरी विठ्ठल’ या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. दिवंगत ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या ‘संतवाणी’मधील अभंग या कार्यक्रमात सादर केले जाणार आहेत.
पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी आणि नातू विराज जोशी हे दोघेही कार्यक्रमात हे अभंग सादर करणार असून त्यांना प्रशांत पांडव (तबला), अविनाश दिघे (संवादिनी), राहुल गोळे (ऑर्गन), गंभीर महाराज (पखवाज), आनंद टाकळकर (टाळ) हे संगीतसाथ करणार आहेत.
सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात ‘संतवाणी कार्यक्रमाबाबत स्वत: पं. भीमसेन जोशी आणि अन्य मान्यवरांनी सांगितलेल्या आठवणी आणि मनोगत ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून सादर केल्या जाणार आहेत. ‘हरी विठ्ठल’चे निवेदन अभिनेत्री व दिग्दर्शिका संपदा जोगळेकर यांचे आहे.
आषाढी एकादशीनिमित्त ‘हरी विठ्ठल’!
श्री षण्मुखानंद फाईन आर्टस् आणि संगीत सभेतर्फे २७ जुलै रोजी मुंबईत माटुंगा (पूर्व) येथील षण्मुखानंद सभागृहात ‘हरी विठ्ठल’ या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
First published on: 19-07-2015 at 12:22 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hari vithal program organised son of bhimsen joshi