श्री षण्मुखानंद फाईन आर्टस् आणि संगीत सभेतर्फे २७ जुलै रोजी मुंबईत माटुंगा (पूर्व) येथील षण्मुखानंद सभागृहात ‘हरी विठ्ठल’ या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. दिवंगत ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या ‘संतवाणी’मधील अभंग या कार्यक्रमात सादर केले जाणार आहेत.
पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी आणि नातू विराज जोशी हे दोघेही कार्यक्रमात हे अभंग सादर करणार असून त्यांना प्रशांत पांडव (तबला), अविनाश दिघे (संवादिनी), राहुल गोळे (ऑर्गन), गंभीर महाराज (पखवाज), आनंद टाकळकर (टाळ) हे संगीतसाथ करणार आहेत.
सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात ‘संतवाणी कार्यक्रमाबाबत स्वत: पं. भीमसेन जोशी आणि अन्य मान्यवरांनी सांगितलेल्या आठवणी आणि मनोगत ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून सादर केल्या जाणार आहेत. ‘हरी विठ्ठल’चे निवेदन अभिनेत्री व दिग्दर्शिका संपदा जोगळेकर यांचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा