२०२१ ची मिस युनिव्हर्स हरनाज संधूला सगळेच ओळखतात. २१ वर्षांनंतर हरनाजने मिस युनिव्हर्सचा ताज भारतात आणला आहे. त्याच्या आधी लारा दत्ताने २००० मध्ये मिस युनिव्हर्सचा ताज भारतात आणला होता. हरनाज मिस युनिव्हर्स बनल्यानंतर सर्वत्र तिची चर्चा सुरु होती. त्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला एक साधारण अभिनेत्री होण्याची इच्छा नाही असे तिने सांगितले आहे.

हरनाजने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर चर्चा केली आहे. “मला एक सामान्य अभिनेत्री व्हायचं नाही, मला एक प्रभावशाली अभिनेत्री व्हायचं आहे, जी एक स्ट्रॉन्ग भूमिका निवडते आणि स्त्रिया काय आहेत आणि त्या काय करू शकतात हे दाखवते. या शिवाय स्त्रियांविषयी असलेले पारंपारिक विचारा मला त्यातून मोडायचे आहेत. मला माझ्या अभिनयाने लोकांना प्रेरित करायचे आहे”, असे हरनाज म्हणाली.

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला अंकिताचा पती काय काम करतो माहिती आहे का?

आणखी वाचा : “कतरिनाच्या लग्नाचे आमंत्रण मिळाले नाही म्हणून…”, लग्न सोहळ्यात हजेरी लावल्यामुळे सलमान झाला ट्रोल

हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा खिताब पटकावल्यानंतर अनेक बॉलिवूडकरांनी तिचे कौतुक केले होते. अनेकांनी सोशल मीडियावर ट्वीट करत यावर भाष्य केले होते. हरनाझ ही मिस युनिव्हर्स या स्पर्धेत भाग घेण्याच्या आधीपासूनच चित्रपट कार्यरत आहेत.

Story img Loader