पंजाबी अभिनेता व गायक हार्डी संधू तरुणाईत खूप लोकप्रिय आहे. तो अनेक कॉन्सर्ट घेतो तसेच खासगी कार्यक्रमांमध्येही सादरीकरण करतो. ‘टकीला शॉट’ या गाण्याने आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या हार्डीने त्याच्याबरोबर एका महिलेने केलेल्या वाईट कृत्याचा अनुभव सांगितला. भर मंचावर एका मध्यमवयीन महिलेने आपल्याशी गैरवर्तन केलं होतं, असा खुलासा त्याने केला आहे.
“मी आयुष्यात पुन्हा कधीच अक्षय कुमारच्या आईची भूमिका करणार नाही,” शेफाली शाहने भर मंचावर दिलं वचन
एका कार्यक्रमात आलेल्या वाईट अनुभवाबद्दल हार्डी संधूने सांगितलं. एका मध्यमवयीन महिलेने भर कार्यक्रमात मंचावर त्याच्याबरोबर गैरवर्तन केलं होतं. तो म्हणाला, “दीड-दोन वर्षांपूर्वी लग्नाचा एक खासगी कार्यक्रम होता. माझ्या समोर, ३०, ४० किंवा ४५ या वयोगटातील एक महिला होती. ती नाचत होती आणि मला म्हणत होती की तिला स्टेजवर माझ्याबरोबर यायचंय. मी तिला म्हणालो, ‘मी तुला बोलावलं तर इतरही येतील आणि मग सगळं कठीण होईल’. पण, तिने हट्ट सोडला नाही, तिने स्टेजवर येण्यासाठी आग्रह धरला. मग, मी होकार दिला. मी म्हणालो, ‘तू स्टेजवर ये’. ती आली आणि माझ्याबरोबर गाण्यावर डान्स करायचा आहे, असं म्हणाली. मी म्हणालो, ‘ठीक आहे, करूया’. आम्ही एका गाण्यावर नाचलो आणि मी म्हणालो, ‘ठीक आहे, आता खुश आहेस ना?’ मग तिने विचारलं, ‘मी तुला मिठी मारू का?’ मी म्हटलं ठीक आहे. पण तिने मला मिठी मारली आणि जिभेने माझ्या कानाला स्पर्श केला.”
“मी तिच्याइतकी सुंदर नाही पण…”, ‘या’ अभिनेत्रीने साकारावी आपली भूमिका, सुधा मूर्तींची इच्छा
हार्डी संधू भारतभर कॉन्सर्ट करत आहे. तो त्याच्या कॉन्सर्टच्या तयारीबद्दल म्हणाला, “कोणत्याही गायकाला एवढं मोठं काहीतरी प्लॅन करायला बराच वेळ लागतो. कारण चाहते वाट पाहत असतात, खरं तर मी त्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतो. माझा ठाम विश्वास आहे की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि मला वाटते की हीच योग्य वेळ आहे. ही पहिलीच वेळ आहे की मी भारताच्या दौऱ्यावर जात आहे आणि मी याबद्दल खूप उत्साहित आहे. प्रेक्षकांनी माझ्यावर आणि माझ्या संगीतावर नेहमीच प्रेमाचा वर्षाव केला आहे. माझ्या चाहत्यांना पाहण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत आहे, त्यामुळे त्यांनीही माझ्या कॉन्सर्टमध्ये आल्यावर पुरेपूर आनंद घ्यावा,” असं हार्डी संधू एचटीशी बोलताना म्हणाला.