Harry Poter Starer Maggie Smith Death : दि प्राईम ऑफ मिस जीन ब्रॉडी आणि कॅलिफोर्निया सूट या चित्रपटांसाठी ऑस्कर जिंकणारी, २१ व्या शतकात डाऊनटन अॅबमे मधील ग्रँथमच्या डोजर काउंटेस आणि हॅरी पॉटरमधील प्रोफेसर मिनर्व्हा मॅकगोनागलची भूमिका साकारलेल्या मॅगी स्मिथ यांचं शुक्रवारी (२७ सप्टेंबर) निधन झालं. मृत्यूसमयी त्या ८९ वर्षांच्या होत्या.

ख्रिस लार्किन आणि टोबी स्टीफन्स या मॅगी यांच्या मुलांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली. लंडनच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मॅगी स्मिथ यांच्या पश्चात दोन मुले आणि पाच नातवंडे असा परिवार आहे. मॅगी स्मिथ या प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या ब्रिटिश महिला कलाकार होत्या. त्यांनी त्यांच्या अफलातून कामातून अनेक पारितोषिके मिळवले असून त्यांचा मोठा चाहता वर्गही आहे.

Nana Patekar praised Ajit Pawar, Nana Patekar,
“अजित पवार त्यांच्या पद्धतीने खूप मोठे काम करत आहेत”, नाना पाटेकर यांनी केले कौतुक; राजकारणात न जाण्याचे सांगितले कारण
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
salman khan sangeeta bijlani marriage broke
जिच्यामुळे मोडलं सलमान खान-संगीता बिजलानीचं लग्न, तिनेच सांगितलं ‘त्या’ दिवशी काय घडलं होतं?
Vijayta Pandit says Kumar Gaurav broke engagement with reema kapoor for nargis daughter
राज कपूर जिच्या प्रेमात होते, तिच्याच मुलीसाठी ‘या’ अभिनेत्याने राज यांच्या लेकीशी लग्न मोडलेलं; अभिनेत्रीने केला मोठा खुलासा
two wheeler entered into actor salman khan s convoy police registered case against biker
अभिनेता सलमान खानच्या ताफ्यात दुचाकी शिरली, दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल
Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
career journey of actor james earl jones
व्यक्तिवेध : जेम्स अर्ल जोन्स
article about veteran film critic and author aruna vasudev
व्यक्तिवेध : अरुणा वासुदेव

१९३४ मध्ये जन्मलेल्या स्मिथ यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात प्लेहाऊस थिएटरमधून केली होती. तर त्यांच्या संपूर्ण कारकि‍र्दीत त्यांना दोनवेळा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. १९७० मध्ये ‘द प्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडी’साठी आणि दुसरा १९७९ मध्ये ‘कॅलिफोर्निया सूट’साठी त्यांना ऑस्कर मिळाला आहे.