‘हॅरी पॉटर’ हे नाव माहीत नसलेली व्यक्ती शोधून सापडणंही अवघड आहे. केवळ कित्येक मुलांचं बालपण अधिक अविस्मरणीय करण्यात याच ‘हॅरी पॉटर’मधील अत्यंत लाडकं असं रुबियस हॅग्रिड हे पात्र साकारणारे रॉबी कॉलट्रेन यांचं निधन झाल्याची बातमी ऐकून हॅरी पॉटरचे चाहते आणि एकूणच मनोरंजनसृष्टीने हळहळ व्यक्त केली. लेखिका जे.के. रोवलिंगपासून चित्रपटातील जवळ जवळ सगळ्याच कलाकारांनी याबद्दल शोक व्यक्त केला आहे.

स्कॉटलंडमधील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हॅरी पॉटरमधील त्यांचं पात्र लोकप्रिय झालं असलं तरी त्यांनी इतरही बऱ्याच चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. जेम्स बॉन्डच्या २ बॉन्डपटात ‘गोल्डनआय’ आणि ‘द वर्ल्ड इज नॉट इनफ’ या दोन्ही चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. इतकंच नाही तर रॉबी यांनी आपल्या बॉलिवूडच्या ऐश्वर्या रायबरोबरही एका चित्रपटात काम केलं आहे. वाचून आश्चर्य वाटेल पण बॉलिवूडच्या या आघाडीच्या अभिनेत्रीबरोबर रॉबी यांनी एका चित्रपटात काम केलं आहे.

Image Of Bajran Sonawane
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांच्या हत्येला ५० दिवस पूर्ण, बजरंग सोनावणे म्हणाले, “आरोपींना पैसे पुरवणारे…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Chhava controversy
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘छावा’ चित्रपटातली ती दृश्यं का कापली जाणार?
Why Elon Musk wants Wikipedia to be defunded
एलॉन मस्कचं विकिपीडियाविरोधात मोठं पाऊल; नाझी सॅल्यूटवरून नव्या वादाची सुरुवात, प्रकरण काय?
right to privacy is guaranteed under Article 21 of the Constitution
आरोपींनाही गोपनीयतेचा मूलभूत अधिकार आहेच!
harry potter look alike
Maha Kumbh 2025: हातात पत्रावळी घेऊन प्रसादावर ताव मारताना दिसला हॅरी पॉटर? काय आहे Viral Videoचे सत्य?
MLA hemant Rasane treatment Guillain Barre syndrome patients
गुइलेन बॅरे सिंड्रोम रुग्णांवर उपचारांसाठी आमदार रासने यांची मोठी मागणी, म्हणाले…!
Anjali damania sudarshan ghule 1
“सुदर्शन घुलेवर ८ गुन्हे, ४९ कलमं”, अंजली दमानियांनी यादीच दिली; म्हणाल्या, “कलमं लिहून थकू, पण गुन्हेगार थकत नाहीत”

आणखी वाचा : ‘कार्तिकेय २’मधील अभिनेत्याने दिला ‘नॉर्थ वि. साऊथ’ या वादाला पूर्णविराम; म्हणाला, “आपण एक उत्तम चित्रपट…”

२००६ साली प्रदर्शित झालेल्या ‘Provoked’ या ब्रिटिश चित्रपटात रॉबी आणि ऐश्वर्या यांनी एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट किरणजीत अहलूवालिया या महिलेच्या जीवनावर बेतलेला होता जीने १९८९ मध्ये आपल्या पतीला जीवंत जाळून त्याची हत्या केली होती. पतीच्या अत्याचाराला कंटाळून त्या स्त्रीने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातं. यामध्ये ऐश्वर्याने मुख्य भूमिका निभावली होती. यानंतर तिला तुरुंगात पाठवलं जातं, आणि आता गेल्यावर तिची एका महिलेशी ओळख होते. त्या महिलेचा भाऊ एक वकील असतो, आणि ही वकिलाची भूमिका रॉबी यांनी साकारली आहे.

यामध्ये रॉबीचे पात्र ऐश्वर्याच्या मुख्य भूमिकेची केस लढतो आणि तिला न्याय मिळवून देतो. हा चित्रपट फारसा चालला नव्हता. रॉबी यांच्या या चित्रपटातील भूमिकेचीही प्रशंसा झाली, पण आजही हॅरी पॉटर हे पुस्तक न वाचलेला आणि चित्रपट न पाहिलेला प्रेक्षकही त्यांना ‘रुबियस हॅग्रिड’ म्हणूनच ओळखतो. रॉबी यांच्या चेहऱ्यावरील तो निरागसपणा आणि ते अत्यंत गोड रुबियस हॅग्रिड हे पात्र लोकांच्या कायम स्मरणात राहील.

Story img Loader