बांगलादेशमधील लहानशी मुलगी अफसाना आझादने हॅरी पॉटर चित्रपटाच्या पाच भागांमधून पद्मा पाटीलची भूमिका साकारली आहे. ती आता मोठी झाली असून, टि्वटरवरील तिचे सुंदर छायाचित्र चर्चेचा विषय झाले आहे. सोशल मीडिया साईटवरून अफसानाचे छायाचित्र सर्वत्र फिरत आहे. अफसानाचे सध्याचे सुंदर रूप पाहून अनेकजण आचंबित होत असले, तरी अफसानाला यात फार काही विशेष वाटत नाही. आपल्यामध्ये आमुलाग्र बदल वगैरे झाला नसून, आपण केवळ मोठे झालो असल्याचे तिचे म्हणणे आहे. आपण नेहमी असेच दिसत होतो. अचानक असं काय झालं हे समजत नसल्याचे तिने टि्वटरवर म्हटले आहे. मात्र, यासर्व प्रकारामुळे टि्वटरवरील तिच्या चाहत्यांच्या आकड्याने ३५ हजाराचा आकडा पार केल्याने ती खुष आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा