स्टार प्रवाह वाहिनीच्या दुर्वा मालिकेतून केशव या व्यक्तिरेखेद्वारे घराघरात पोहोचलेला अभिनेता हर्षद अटकरी आता नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या नव्या मालिकेतून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीसोबतची हर्षदची ही दुसरी मालिका आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना हर्षद म्हणाला, “मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की बाप्पाच्या आशीर्वादाने गणेशोत्सवाच्या काळात माझ्या नव्या मालिकेचा श्रीगणेशा होतोय. स्टार प्रवाहच्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत मी शुभम ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. या मालिकेचं शूटिंग करताना मला दुर्वा या मालिकेचे दिवस आठवतात कारण मालिकेचे दिग्दर्शक दीपक नलावडे यांच्यासोबत मी दुर्वामध्येही काम केलं होतं. दिग्दर्शकांची तीच टीम या मालिकेतही आहे. केशव या पात्राच्या पूर्णपणे वेगळं पात्र मी ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत साकारतो आहे. अतिशय शांत आणि मवाळ असं हे पात्र आहे. त्यामुळे या मालिकेसाठी मी खूपच उत्सुक आहे.”

२ सप्टेंबरपासून रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harshad atkari in new serial phulala sugandh maticha ssv