यावेळच्या ‘झलक दिखला जा’ या डान्सिंग रिअॅलिटी शोला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नसून, यातील सेलिब्रिटी डान्सर्स नको त्या कारणांसाठी चर्चेत आहेत. मागील आठवड्यात झलकची सूत्रसंचालक आणि अभिनेत्री द्रष्टी धामीने हा शो सोडला होता, आता मिळालेल्या माहितीनुसार, तिचा सह-सूत्रसंचालक रणवीर शौरीलासुद्धा हा शो सोडून जाण्यास सांगितल्याचे समजते. दृष्टी ही या शोच्या सहाव्या पर्वाची विजेती राहिली आहे. तर, रणवीर शौरी ७ जूनपासून सुरू झालेल्या या शोचा सह-सूत्रसंचालक आहे. अद्याप याबाबत अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली नसली, तरी रणवीरने केलेल्या टि्वटचा रोख याच दिशेने जात असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे शोमधला एक स्पर्धक व्हिजे अॅण्डीच्या जागेवर अन्य एक अभिनेता येणार असल्याचेदेखील बोलले जात आहे. व्हीजे अॅण्डी हा झलकमधून बाहेर पडणारा पहिला स्पर्धक आहे.

Story img Loader