‘काय पो छे’ अभिनेता सुशांत सिंग राजपूतने प्रेयसी अंकिता लोखंडेसोबत लग्न केल्याची चर्चा सध्या सुरु आहे. हे दोघे गेले पाच वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते.
त्यांच्या लिव्ह इन रिलेशनशिपला घरच्यांचा विरोध होत असल्यामुळे त्यांनी लग्न केले. तसेच, दोघांच्याही करियरवर याचा परिणाम होऊ नये म्हणून त्यांच्या लग्नाची बातमी गुपित ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्रानुसार, मूळची इंदौरची असलेल्या अंकिताने लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घरी कळवताच घरच्यांनी तिला यास परवानगी देण्यास नकार दिला. मात्र, त्या दोघांनी लग्न करून एकत्र राहण्यास त्यांची काहीच हरकत नसल्याचे सांगितले. यावर अंकिता आणि सुशांतने उज्जैन येथे लग्न केले आणि ते मुंबईला परतले. इंदौरच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या या दोघांची भेट झाली. त्यानंतर ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोमध्ये सुशांतने अंकिताला प्रपोज केले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा