अभिनेता सलमान खान याला ‘धुम-४’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी विचारणा करण्यात आल्याची चर्चा आहे. दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी सलमानसमोर या भूमिकेचा प्रस्ताव ठेवल्याचे समजते. याशिवाय, चित्रपटाची नायिका म्हणून वाणी कपूरच्या नावाचा विचार सुरू आहे. ‘स्पॉटबॉय’च्या माहितीनुसार, सुरूवातीला या भूमिकेसाठी ह्रतिक रोशन , शाहरूख खान आणि अमिताभ बच्चन यांनाही विचारण्यात आले होते. त्यामुळे सलमान आता त्याचा पहिलावहिला खलनायक साकारणार का, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. सलमान आणि वाणी सध्या अनुक्रमे आदित्य चोप्राची निर्मिती असलेल्या ‘सुलतान’ आणि ‘बेफिकरे’ च्या चित्रीकरणात व्यग्र आहेत.

Story img Loader